TRENDING:

चांदीच्या ताटात सोन्याचा घास! जेवणासाठी लागतात रांगा, पुण्यातील ठिकाण माहितीये का?

Last Updated:
पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील वंदना पंडित आणि त्यांचे पती सीताराम पंडित हे दाम्पत्य गेली 27 वर्ष झालं केटरिंगचा व्यवसाय करत आहेत. मागील 8 वर्षांपासून त्यांनी मोरे गोसावी मंदिराजवळ स्वामी स्नेह डायनिंग हॉल सुरू करून चांदीच्या ताटात अस्सल सात्विक जेवणाची थाळी देत आहेत.
advertisement
1/7
चांदीच्या ताटात सोन्याचा घास! जेवणासाठी लागतात रांगा, ठिकाण माहितीये का?
पूर्वी परंपरेनुसार चांदीला फार महत्त्व असून ती आरोग्यदायी ही मानली जाते. आपण ही काही तरी परंपरेची कास धरत करूया म्हणत पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील वंदना पंडित आणि त्यांचे पती सीताराम पंडित हे दाम्पत्य गेली 27 वर्ष झालं केटरिंगचा व्यवसाय करत आहेत.
advertisement
2/7
मागील 8 वर्षांपासून त्यांनी मोरे गोसावी मंदिराजवळ स्वामी स्नेह डायनिंग हॉल सुरू करून चांदीच्या ताटात अस्सल सात्विक जेवणाची थाळी देत आहेत. याठिकाणी ही थाळी खाण्यासाठी मोठी गर्दी असते.
advertisement
3/7
वंदना पंडित आणि त्यांचे पती सीताराम पंडित यांनी 1997 साली केटरिंगच्या व्यवसायाची सुरुवात केली. तेव्हा अगदी छोट्या प्रमाणात ते व्यवसाय करत होते.
advertisement
4/7
नंतर हळूहळू हा व्यवसाय त्यांनी वाढवला. त्यामध्ये काही बदल करण्यात आले. सुरुवातीपासून केटरिंगचा व्यवसाय हा होता परंतु मागील 8 वर्षांपासून त्यांनी स्वामी स्नेह नावाने डायनिंग हॉल सुरू केला आहे. या ठिकाणी ते चांदीच्या ताटात अस्सल सात्विक जेवणाची थाळी देत आहेत.
advertisement
5/7
आम्ही घरातील 5 लोक तर इतर स्टाफ हा 58 लोक एकूण 63 लोक मिळून काम करत आहोत. डायनिंग हॉलची सुरुवात करण्याचं मुख्य कारण हे की केटरिंगची ऑर्डर दिल्याशिवाय तुमचे कडचे जेवण करायला मिळत नाही.
advertisement
6/7
लोकांच्या या मागणीमुळे लोकांना कधी ही आपल्या हातचं जेवण मिळू शकेल. यासाठी डायनिंग हॉलचा व्यवसाय सुरू करण्यात आला. त्याला पारंपरिकतेची जोड देत चांदीच्या ताटात सात्विक जेवण थाळी सुरू केली, असं वंदना पंडित सांगतात.
advertisement
7/7
चांदीच्या ताटामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रीयन जेवण हे दिलं जातं. त्यामध्ये 13 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ पाहिला मिळतात. तर गोडाशिवाय हे ताट 260 रुपये आणि गोड पदार्थ घेतला तर त्याचे दर हे तसे त्यामध्ये ऍड होतात. पुरणपोळी, मुग हलवा, रबडी, गुलाबजाम, श्रीखंड जे महाराष्ट्रात तयार होणारे पदार्थ आहेत तेच देण्याचा प्रयत्न हा आम्ही करतो. सुरुवात केली तेव्हा 50 ताट घेऊन ती केली होती. हळू हळू 20 ते 30 ताट घेत अशी आता जवळपास 130 ताट ही आहेत. पुढील काही दिवसात 400 ताट करण्याचा आमचा निर्धार आहे, अशी माहिती वंदना पंडित यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
चांदीच्या ताटात सोन्याचा घास! जेवणासाठी लागतात रांगा, पुण्यातील ठिकाण माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल