TRENDING:

चीज बर्स्ट ते शेजवान ; कोळशाच्या भट्टीवर भाजलेल्या वडापावचा ‘इथं’ घ्या आस्वाद

Last Updated:
पुण्यात एकाच ठिकाणी 6 वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव मिळतात.
advertisement
1/6
चीज बर्स्ट ते शेजवान ; कोळशाच्या भट्टीवर भाजलेल्या वडापावचा ‘इथं’ घ्या आस्वाद
महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांमध्ये वडापाव हा सर्वात फेमस पदार्थ म्हणून ओळखला जातो. मुंबई आणि पुण्यातले वडापाव हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यातल्या</a> प्रत्येक भागातले वडापावचे गाडे असून तिथं नेहमी गर्दी असते.
advertisement
2/6
या गर्दीमध्ये आपला वडापाव इतरांपेक्षा हटके असावा असा सर्वांचा प्रयत्न असतो. पुण्यात एकाच ठिकाणी 6 वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव मिळतात.
advertisement
3/6
पुण्यातल्या पौड रोड भागात प्रतिक निळगुळकर यांनी 2018 साली एका छोट्याश्या गाड्यावर हा वडापाव सुरू केला. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे त्यांना तो गाडा देखील बंद करावा लागला. या संकटानंतरही ते खचले नाहीत. त्यांनी एका हटके कल्पनेसह पुन्हा एकदा बाजारात पाऊल ठेवलं.
advertisement
4/6
एकाच प्रकारचा वडापाव देण्यापेक्षा वडापावचे वेगवेगळे प्रकार निगुळकर यांनी सुरू केले. त्यांच्याकडं साध्या वडापावसह चीज बर्स्ट, तंदूर, झटका, पेरी पेरी, मेयोनीज आणि शेजवान असे प्रकार मिळतात.
advertisement
5/6
या वडापावची किंमत 25 रुपयांपासून सुरू होते. हे वडापाव कोळशाच्या एका भट्टी वर भाजले जातात. त्यानंतर ग्रील केले जातात. पांढऱ्या रंगाची खास चटणी आणि वेफर्ससोबत हे वडापाव सर्व्ह केले जातात.हे कुरकुरीत वडापाव खाण्यासाठी इथं नेहमी गर्दी असते.
advertisement
6/6
हा वडापाव शॉप. नंबर 4, देवयानी श्री अपार्टमेंट शिवतीर्थ नगर, पौड रोड कोथरुड, पुणे येथे खायला मिळेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
चीज बर्स्ट ते शेजवान ; कोळशाच्या भट्टीवर भाजलेल्या वडापावचा ‘इथं’ घ्या आस्वाद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल