डॉक्टर विकतायेत जात्यावरचं पीठ, किलोला दीड हजारांचा भाव, असं काय आहे खास?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
Food Business: कुटुंबाची साथ मिळाल्याने सोलापूरच्या महिला डॉक्टरने स्वत:चा माडग्याचे पीठ विक्रीचा बिझनेस सुरू केला आहे. घरगुती व्यवसायातून त्या चांगली कमाई करत आहेत.
advertisement
1/7

एखाद्या महिलेनं ठरवलं तर कुटुंबाच्या साथीने ती स्वत:चं उद्योगविश्व उभारू शकते. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अनगरच्या डॉ. स्वाती थिटे होय. काळाच्या ओघात लोप पावत असणाऱ्या माडग्याची चव त्यांनी हजारो लोकांना चाखायला दिलीये. जात्यावर दळून तयार केलेल्या तिखट आणि गोड हुलग्याच्या माडग्याचा वसुंधरा ब्रँडला मोठी मागणी आहे.
advertisement
2/7
मोहोळ तालुक्यातील अनगर येथे राहणाऱ्या डॉ. स्वाती थिटे गेल्या 4 वर्षापासून घरगुती माडगे बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. पारंपारिक पद्धतीने जात्यावर हुलगा दळून त्यांचे पीठ चुलीवर शिजवून माडगे बनवले जाते. हुलग्याच्या माडग्यामुळे कफ, वात आणि मेद कमी होतो. विशेषतः कणकण, सर्दी-पडसे यावर ते गुणकारी मानले जाते.
advertisement
3/7
माडगे बनविण्यासाठी एक किलो हुलगे स्वच्छ करून लोखंडी तव्यावर भाजले जातात. थंड झाल्यानंतर जात्यावर दळून त्याचे बारीक पीठ तयार करतात. हे पीठ चाळणीने चाळले जाते. तिखट माडग्यासाठी एक किलो हुलगा पीठ, 15 ग्रॅम तिखट, 7 ग्रॅम हळद, 15 ग्रॅम जिरेपूड, 15 ग्रॅम धनेपूड, 40 ग्रॅम सैंधव मीठ आणि 10 ग्रॅम ओवा मिसळून एकत्रित केले जाते.
advertisement
4/7
डॉ. स्वाती थिटे या प्रत्येकी 100 ग्रॅमचे पॅकिंग तयार करतात. गोड माडग्यासाठी याच पद्धतीने जात्यावर हुलगा दळून पीठ करतात. 500 ग्रॅम पिठामध्ये 500 ग्रॅम सेंद्रिय गूळ, 20 ग्रॅम वेलदोडा, 20 ग्रॅम जायफळ, 50 ग्रॅम बडीशेप, 5 ग्रॅम सैंधव मीठ मिसळून एकत्रित केले जाते.
advertisement
5/7
माडग्यासाठी तयार पीठाचे पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. 100 ग्रॅमच्या एका माडग्याच्या पाकिटाची किंमत 120 ते 150 रुपये आहे. सोलापूर शहर व जिल्हासह मुंबई, पुणे, लातूर, कर्नाटक, सांगली येथून सुध्दा ग्राहकांची या माडग्याला चांगली मागणी आहे.
advertisement
6/7
माडगे विक्रीच्या व्यवसायातून डॉ.स्वाती थिटे या महिन्याला एक लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. तर सर्व खर्च वजा करून महिन्याला 30 ते 40 हजार रुपये पर्यंतचा नफा त्यांना मिळत आहे.
advertisement
7/7
“महिलांना सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यास भरपूर संधी आहे. फक्त त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. जेव्हा एखादे कुटुंब घरातील महिलेला प्रोत्साहन देते, तेव्हा ती खूप काही करू शकते,” असं डॉ.स्वाती थिटे सांगतात. (इरफान पटेल, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
डॉक्टर विकतायेत जात्यावरचं पीठ, किलोला दीड हजारांचा भाव, असं काय आहे खास?