TRENDING:

Ghee Benefits : पचनशक्ती मजबूत, चेहरा ग्लो करेल; पचनाच्या समस्येवर तूप ठरेल घरगुती उत्तर

Last Updated:
तुपामधे अ, ड, ई आणि के जीवनसत्त्वं तसंच फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारखे पोषक घटक असतात. हे सर्व घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. तूप नियमित खाण्यानं पचनसंस्था मजबूत राहते आणि हाडं निरोगी राहतात.
advertisement
1/6
पचनशक्ती मजबूत, चेहरा ग्लो करेल; पचनाच्या समस्येवर तूप ठरेल घरगुती उत्तर
फक्त उत्तम तब्येतीसाठीच नाही तर, शरीरासाठीही उपयुक्त असे तूप आहे. अनेक जण म्हणतात, तूप खाल्ल्याने जाड होण्याची शक्यता असते. परंतु फक्त तब्येतीसाठीच नाही तर, शरीरासाठीही तूप फार उत्तम आहे. अनेक जण दिवसाची सुरुवात गरम पाण्यानं करतात. तर काही जण कोमट पाण्यात लिंबू, मध घालून पाणी पितात.
advertisement
2/6
तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं. तुपामधे अ, ड, ई आणि के जीवनसत्त्वं शिवाय, फॉस्फरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारखे पोषक घटक असतात. हे सर्व घटक शरीरासाठी फायदेशीर असतात. तूप नियमित खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत राहते आणि हाडं निरोगी राहतात.
advertisement
3/6
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप मिसळून खाल्ल्याने शरीरासाठी पोषक तत्व मिळतात. पोटाच्या समस्या वारंवार त्रास देत असतील तर दररोज सकाळी एक चमचा तूप कोमट पाण्यात मिसळून पिणं सुरुवात करा. यामुळे आतडी स्वच्छ होतात आणि पचनसंस्था मजबूत होते, ज्यामुळे पचन खूप सोपं होतं.
advertisement
4/6
आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर तूप उपयुक्त आहे. कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्यानं आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
advertisement
5/6
वयानुसार किंवा हिवाळ्यात सांधेदुखी ही एक मोठी समस्या आहे. यापासून आराम मिळवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप मिसळून पिऊ शकता. यामुळे सांधे मजबूत होतील आणि सांध्यांना चांगलं वंगण मिळेल.
advertisement
6/6
रोज रिकाम्या पोटी पाण्यात तूप टाकून प्यायल्यानं शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात. हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे चेहऱ्यावरील डाग हळूहळू साफ होऊ लागतात आणि त्वचा उजळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ghee Benefits : पचनशक्ती मजबूत, चेहरा ग्लो करेल; पचनाच्या समस्येवर तूप ठरेल घरगुती उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल