Mumbai Indians : बंड्या आला रे...! रोहित शर्माच्या खास भिडूची पलटणमध्ये एन्ट्री! अंधेरीच्या पोराला लागला लाखोंचा जॅकपॉट
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mumbai Indians bandya is back Atharva ankolekar : अथर्व अंकोलेकर मुंबई क्रिकेट संघातून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. अथर्वने क्रिकेटपटू व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. वडील गेल्यानंतर त्याने हे स्वप्न पूर्ण केलंय.
advertisement
1/7

यंदाच्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने लोकल खेळाडूंवर भर दिला अन् पाच खेळाडूंना सामील करून घेतलं. यामध्ये चौथ्या मुंबईकर खेळाडूची एन्ट्री झाली आहे.
advertisement
2/7
हा मुंबईकर खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून अथर्व अंकोलेकर आहे. त्याला 2020 मध्ये मुंबईने शोधून काढला होता. अथर्वने भारतीय संघाला अंडर-19 वर्ल्डकप जिंकून दिला होता.
advertisement
3/7
अथर्व अंकोलेकर मुंबई क्रिकेट संघातून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. अथर्वने क्रिकेटपटू व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. वडील गेल्यानंतर त्याने हे स्वप्न पूर्ण केलंय.
advertisement
4/7
अथर्व मुंबईत अंधेरीमध्ये राहतो. पार्ल्यातील प्रसिद्ध पार्ले टिळक इंग्रजी माध्यम शाळेत आणि मग रिझवी महाविद्यालयातर्फे क्रिकेट खेळत होता, आता तो थेट मुंबई इंडियन्सकडून आपला जलवा दाखवणार आहे.
advertisement
5/7
रोहित शर्माकडून प्रेरणा घेऊन अथर्वने क्रिकेटमध्ये आपली जागा मजबूत केली. यशस्वी जयस्वाल आणि सूर्यकुमार यादवसह अथर्वने ड्रेसिंग रुम शेअर केली आहे.
advertisement
6/7
अशातच आता तो मुंबई इंडियन्सकडून आपली ताकद दाखवणार आहे. ऑलराऊंडर असलेल्या अथर्वला आता प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
7/7
दरम्यान, अथर्व अंकोलेकरची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री होताच पलटणच्या सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलीये. आपला बंड्या घरी आला, असं मुंबई इंडियन्सने लिहिलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : बंड्या आला रे...! रोहित शर्माच्या खास भिडूची पलटणमध्ये एन्ट्री! अंधेरीच्या पोराला लागला लाखोंचा जॅकपॉट