मैत्रीच्या नात्याला काळीमा
मिळालेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबरच्या दुपारी सुमारे दोन ते अडीचच्या दरम्यान आरोपी मुलगा तिच्या घरी गेला होता. घरात कुणीही नसल्याची संधी साधताच त्याने मुलीवर अत्याचार केला. या अत्याचारानंतर पीडित मुलीला गंभीर मानसिक आणि शारीरिक त्रास झाला आणि तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान या घटनेची माहिती सर्वांना समजली गेली.
advertisement
घटना उघडकीस येताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी बांगुरनगर पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पोक्सो अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेनुसार अटक करून बालसुधारगृहात पाठविण्यात येणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 17, 2025 10:30 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : मुंबई हादरली! मित्रानेच केला घात, घरात कोणी नसल्याचे पाहून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
