सैफ अली खानला पॅरालिसीस होण्याची भीती; हल्ल्याच्या 11 महिन्यांनंतर अभिनेत्याने केला मोठा खुलासा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Saif Ali Khan : सैफ अली खान म्हणाला, काही काळासाठी मी माझ्या पायाची संवेदना गमावली. आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहण्याचा किंवा अर्धांगवायूचा विचार करणंही भयानक होतं आणि अजूनही त्याची भीती वाटते.
advertisement
1/5

अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला 11 महिने उलटून गेले आहेत आणि आता अभिनेत्याने मोठा खुलासा केला आहे. सैफ अली खानला पॅरालिसिस होण्याचा धोका होता. वाटलं आपण अंथरूणावरून उठणार नाही, अशी भीतीही त्याने व्यक्त करून दाखवली. एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या मनातील सगळी भीती बाहेर काढली आहे.
advertisement
2/5
जानेवारीमध्ये सैफ अली खानवर त्याच्याच घरात एका अज्ञाताने हल्ला केला होता. सैफच्या पाठीत चाकू खुपसला होता. चाकूचा काही भागही सैफच्या पाठीत अडकला होता. जो नंतर डॉक्टरांनी बाहेर काढला. सैफच्या मणक्याला संवेदनशील भागाजवळ दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला लकवा मारण्याचा धोका होता.
advertisement
3/5
द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सैफने सांगितलं की, "मी खूप भाग्यवान आहे असं मला वाटतं, कारण मी वाचलो. मला पाठीच्या कण्याला सौम्य दुखापत झाली होती, ज्यामुळे अर्धांगवायू होऊ शकतो. काही काळासाठी मी माझ्या पायाची संवेदना गमावली. आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहण्याचा किंवा अर्धांगवायूचा विचार करणंही भयानक होतं आणि अजूनही त्याची भीती वाटते.
advertisement
4/5
सैफ पुढे म्हणाला की, तो नेहमीच त्याचं जीवन एक आशीर्वाद मानत आला आहे आणि या घटनेने तो विश्वास दृढ केला आहे. तो म्हणाला, "मी नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की प्रत्येक दिवस एक देणगी आहे. कदाचित या घटनेने ती भावना अधिकच गहिरी केली आहे"
advertisement
5/5
"कधीकधी मला असं वाटतं की माझे नऊ जीवन आहेत. जरी मी उद्या जाऊ शकतो आणि लोक म्हणतील, 'मी फक्त नऊ जीवनांबद्दल बोलत होतो.' पण सत्य हे आहे की, मी अनेक वेळा अगदी जवळून पळून गेलो आहे", असं सैफने सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
सैफ अली खानला पॅरालिसीस होण्याची भीती; हल्ल्याच्या 11 महिन्यांनंतर अभिनेत्याने केला मोठा खुलासा