Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत पारा घसरला, हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:
Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, शहापूर, बदलापूर आणि मुरबाड परिसरात गारठा वाढला आहे. 17 डिसेंबरचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5

राज्यातील थंडीची लाट ओसरली असली तरी पुढील 4-5 दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. परंतु, त्यानंतर पुन्हा हवामानात मोठ्या बदलांची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली आणि परिसरात देखील हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 17 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याणमध्ये पुढील 7 दिवस थंडीचा कडाका राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविले आहे. किमान तापमाना 19.2 अंशांवर राहण्याची शक्यता असून वातावरण थंड आणि निरभ्र राहील. तर कमाल तापमानाच पारा 34.8 अंशांपर्यंत चढेल. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गारठा तर दिवसा उकाडा जाणवेल.
advertisement
3/5
डोंबिवली शहरात मंगळवारी असलेल्या थंड आणि उबदारपणा हवामानात आज किंचित बदल होण्याची शक्यता आहे. सकाळ आणि रात्री हवामानात थोडा गारठा जाणवेल, पण थंडीची तीव्रता कमी होईल. कमाल तापमान 31 ते 32°C आणि किमान 16 ते 17°C पर्यंत असू शकते. दिवसा ऊन आणि रात्री हलका गारठा जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
ग्रामीण भागात पुढील काही दिवस हवामानात बदल नसून थंडीचा कडाका कायम राहणार आहे. सकाळ-संध्याकाळी गारठा जाणवेल, त्यामुळे किमान तापमान 14°C पर्यंत आणि कमाल तापमान 38°C च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री गारठा जाणवेल पण थंडीची लाट कमी होऊन हवामान सामान्याकडे परतताना दिसेल.
advertisement
5/5
बदलापूर शहरातील पारा घसरला असून किमान तापमान सुमारे 12°C तर कमाल 24°C पर्यंत असेल. आसपासच्या ग्रामीण भागात हवामान आल्हाददायक आणि कोरडे राहील, दिवसा तापमान वाढेल आणि रात्री हवामान थंड राहील. शहापूर आणि मुरबाडमध्ये हवामान कोरडे असेल. कमाल तापमान 30 ते 35°C, आणि किमान तापमान 16 ते 19 अंश सेल्सिअस राहील. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत पारा घसरला, हवामान विभागाचा पुन्हा अलर्ट