TRENDING:

झोपच पूर्ण होत नाही, कूस बदलताच होते सकाळ? 'हे' 6 पदार्थ खाऊन बघा, राहाल ऊर्जावान

Last Updated:
आजकाल आपलं जगणं इतकं धावपळीचं झालंय की, वेळच्या वेळी जेवण्याचीही आपल्याला मुभा नसते. झोप पूर्ण व्हावी एवढाही वेळ आपल्याकडे नसतो. त्यामुळे मिळतील तितके तास शांत झोपण्याचा प्रयत्न आपण करतो, परंतु मोबाईल आणि कॉम्पुटरची स्क्रिन बराच वेळ समोर असल्याने अनेकजणांना निद्रानाशाची समस्या जाणवते. शिवाय झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर शरिरात आळस असतो. आज आपण वरिष्ठ आयुर्वेदिक डॉक्टर राजेश पाठक यांनी याबाबत सांगितलेले घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. (कैलाश कुमार, प्रतिनिधी / बोकारो)
advertisement
1/7
झोप पूर्ण होत नाही, कूस बदलताच होते सकाळ? हे 6 पदार्थ खा, राहाल ऊर्जावान
आळशीच्या बिया : डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आळशी हा निद्रानाशावर सर्वोत्तम उपाय आहे. या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. शिवाय यातील मेलेटॉनिनमुळे झोप चांगली लागते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर आळशीच्या बिया घातलेलं ग्लासभर दूध प्यायल्यास झोप पूर्ण होते.
advertisement
2/7
बदाम : डॉ. राजेश पाठक सांगतात की, बदामात मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे ताण-तणाव कमी होतो. परिणामी झोप चांगली लागते. दररोज 6 ते 7 बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी साल काढून ते खाल्ल्यास आपल्याला हा परिणाम पाहायला मिळेल.
advertisement
3/7
दही आणि मधाचं मिश्रण : उन्हाळ्यात एका लहान वाटीत दही घेऊन त्यात चमचाभर मध मिसळून रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्यास मन शांत राहतं आणि झोप चांगली लागते.
advertisement
4/7
मासे : मासे आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी असतात. त्यात ओमेगा-3 आणि व्हिटॅमिन डीसह अनेक पौष्टिक तत्त्व असतात. ज्यांचा आरोग्याला प्रचंड फायदा होतो, झोपही पूर्ण होते.
advertisement
5/7
भोपळ्याच्या बिया : भोपळ्याच्या 5 कोरड्या बिया चावून खाल्ल्यास निद्रानाशाच्या समस्येवर आराम मिळतो. झोप पूर्ण झाल्याने शरीर छान ऊर्जावान राहतं.
advertisement
6/7
मोहरीचं तेल : रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांना मोहरीचं तेल लावल्यास अशक्तपणा दूर होतो. शिवाय शांत झोपही लागते. 
advertisement
7/7
इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल. (फोटो काल्पनिक आहे. सौजन्य : Canva)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
झोपच पूर्ण होत नाही, कूस बदलताच होते सकाळ? 'हे' 6 पदार्थ खाऊन बघा, राहाल ऊर्जावान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल