TRENDING:

रोज खा 5 ग्रॅम चॉकलेट, शरीराला होईल फायदा; ‘या’ आजारपासून राहाल दूर

Last Updated:
चॉकलेट हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने खातात. चॉकलेट खाण्याचे आपल्या शरीराला फायदे देखील आहेत.
advertisement
1/7
रोज खा 5 ग्रॅम चॉकलेट, शरीराला होईल फायदा; ‘या’ आजारपासून राहाल दूर
चॉकलेटचं नाव जरी घेतलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं. चॉकलेट हा एक असा पदार्थ आहे जो लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आवडीने खातात. चॉकलेट खाण्याचे आपल्या शरीराला फायदे देखील आहेत.
advertisement
2/7
हे कदाचित बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण हे खर आहे. डार्क चॉकलेट खाण्याचे आपल्या शरीराला फायदे होतात. हेच फायदे कोणते आहेत आणि खायची योग्य पद्धत काय आहे याबद्दलच <a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/">छत्रपती संभाजीनगरमधील</a> आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
ज्या व्यक्तींना रक्तदाब आहे म्हणजे लो बीपी आहे अशा व्यक्तींनी डार्क चॉकलेट हे खायला पाहिजे. यामुळे त्यांचा रक्तदाब नियंत्रणामध्ये येतो. जेव्हा आपण पोटामध्ये काही सॉलिड अन्न घेतो म्हणजे नाष्टा केल्यानंतर किंवा जेवण केल्यानंतर त्यानंतर दररोज शरीरात फक्त पाच ग्रॅम एवढं चॉकलेट जायला पाहिजे. चॉकलेटची मात्रा जरी कमी असले तरी सुद्धा ती मात्र रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत करते.
advertisement
4/7
त्याचबरोबर बीपी कमी किंवा वाढला असेल तर तो सुद्धा या डार्क चॉकलेटमुळे नियंत्रणात येतो. बीपी वाढला असेल तर तुम्ही कोणत्याही पेयासोबत ज्यूस सोबत डार्क चॉकलेट क्रश करून घेऊ शकता किंवा नारळ पाण्यासोबत सुद्धा तुम्ही चॉकलेट क्रश करून घेतले तरी चॉकलेटमध्ये असलेल्या घटकांमुळे बीपी हा नियंत्रणात यायला मदत होते. पण त्याची मात्र ही पाच ग्रॅम एवढीच असावी त्यापेक्षा जास्त नसावी, असं अलका कर्णिक सांगतात.
advertisement
5/7
आपण आपल्या मुलांना इतर जसे चॉकलेट खायला देतो तसेच डार्क चॉकलेट देखील खायला द्यायला पाहिजे. याचे त्यांच्या शरीरातील फायदे होतात. त्यामुळे आईने त्यांच्या मुलांना चॉकलेट खायला द्यायलाच पाहिजे पण त्याची मात्र ही पाच ग्रॅम एवढीच असावी त्यापेक्षा जास्तही नसावी.
advertisement
6/7
जर तुम्ही रोज डार्क चॉकलेट ख्यायचं ठरवलं असेल तर त्यासाठी तुमच्या हालचाली होणे गरजेच्या आहेत. म्हणजे जर तुमची बैठी जीवनशैली असेल तर किंवा तुमचं काम आहे तासनतास बसून असेल तर डार्क चॉकलेट घेतल्यानंतर तुम्ही चालणं हे अत्यंत महत्त्वाचा आहे,असं अलका कर्णिक सांगतात.
advertisement
7/7
(टीप : बातमीतील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक आहेत. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. News18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
रोज खा 5 ग्रॅम चॉकलेट, शरीराला होईल फायदा; ‘या’ आजारपासून राहाल दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल