TRENDING:

मिठाचे असतात 5 प्रकार, जाणून घ्या कोणतं मीठ कोणत्या आजारावर लाभदायी?

Last Updated:
रोजच्या जेवणाला मिठाशिवाय चव नसते. त्यामुळे रोजच्या आहारात चवीसाठी मिठाचा समावेश केला जातो. पण मीठ जास्त प्रमाणात खाणंही धोकादायक मानलं जातं. मिठाचे विविध 5 प्रकार आहेत. विशेष म्हणजे त्याचं आरोग्याच्या दृष्टीनं खास महत्त्व आहे.
advertisement
1/7
मिठाचे असतात 5 प्रकार, जाणून घ्या कोणतं मीठ कोणत्या आजारावर लाभदायी?
मिठाचे 5 प्रकार असून <a href="https://news18marathi.com/tag/health/">आयुर्वेदिक</a> दृष्ट्या प्रत्येक प्रकाराचं खास महत्त्व आहे. त्याचे आरोग्यासाठी विशेष फायदे असून विविध आजारांवर ते लाभदायी मानलं जातं. याबाबत हल्द्वानी येथील आयुर्वेदिक डॉक्टर विनय खुल्लर यांनी माहिती दिलीय.
advertisement
2/7
आयोडीनयुक्त मीठ हे आयोडीन समृद्ध असल्याने थायरॉईड ग्रंथीसाठी खूप फायदेशीर आहे. हे मीठ घरांमध्ये सर्वात जास्त वापरलं जातं. पण हे मिठाचंही मर्यादित प्रमाणात सेवन केलं पाहिजे. आयोडीनयुक्त मीठ खाल्ल्याने ताण-तणाव कमी होतो.
advertisement
3/7
काळं मीठ आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. त्यात सल्फरचं प्रमाण जास्त असल्यानं पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी मानलं जातं. या मिठाचं दररोज सेवन केल्यानं बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅस सारख्या पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच काळं मीठ वजन कमी करण्यास, बीपी नियंत्रित करण्यास आणि छातीत जळजळ कमी करण्यास मदत करतं.
advertisement
4/7
सैंधव मीठ हे सर्वोत्तम मानलं जातं. उपवासाच्या वेळीही याचं सेवन केलं जातं. या मीठामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, जस्त, तांबे यांसारखी खनिजे असतात. छातीत जळजळ, पचनाशी संबंधित समस्या, सूज आदी समस्यांपासून सैंधव मीठ खाल्ल्यानं आराम मिळतो.
advertisement
5/7
गुलाबी मीठ हे हिमालयात आढळतं. हे मीठ चवीला थोडं गोड असतं. त्याचं दररोज मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो. या मिठाचं सेवन केल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्यास मदत होते. ज्यामुळे डिहायड्रेशन सारख्या समस्या टाळता येतात. तसेच हे मीठ मेंदूतील सेरोटोनिन हार्मोन्स वाढवून तणावापासून आराम देते. तसेच त्वचा स्वच्छ ठेवण्यासही मदत होते.
advertisement
6/7
समुद्रातील मीठ समुद्राच्या पाण्यापासून बनवले जाते. त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांसारखी खनिजे असतात. या मीठामध्ये असणारं कॅल्शियम दात आणि हाडं मजबूत करते. मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास हे मदत करते. परंतु, समुद्री मिठाचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं, अन्यथा उच्च रक्तदाब होऊ शकतो.
advertisement
7/7
सूचना: या बातमीत दिलेले औषधे आणि आरोग्यविषयक सल्ले तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहेत. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरावी. अशा कोणत्याही वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही हानीसाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
मिठाचे असतात 5 प्रकार, जाणून घ्या कोणतं मीठ कोणत्या आजारावर लाभदायी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल