Health Care: महिला की पुरुष? हार्टअटॅकचा जास्त धोका कुणाला, तुम्हाला माहितीये का?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Heart Care: बदलत्या जीवनशैलीमुळे सध्याच्या काळात हृदयविकार आणि इतर आजारांचा धोका वाढला आहे. पण याचा धोका पुरुष की स्त्रिया? कुणाला अधिक असतो याबाबत डॉक्टरांनी माहिती दिलीये.
advertisement
1/7

सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. बऱ्याच जणांना हृदयविकाराच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. हार्टअटॅक येण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात.
advertisement
2/7
पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण कमी आहे. याचं नेमकं कारण काय आहे? याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. गणेश सपकाळ यांनी माहिती दिलीये.
advertisement
3/7
सध्या पुरुषांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पुरुषांचा तुलनेमध्ये महिलांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण कमी आहे. याची विविध कारणे आहेत. पण यातलं सर्वात महत्त्वाचं कारण ताण-तणाव म्हणजेच टेन्शन आहे. टेन्शनमुळे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढल्याचं डॉक्टर सांगतात.
advertisement
4/7
पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असतं. यामध्ये हार्मोन्सचा प्रभाव तसंच दैनंदिन जीवनशैली कारणीभूत असते. शारीरिक जडण घडण, काही अनुवंशिक घटक, व्यसन या कारणांनी पुरुषांना धोक अधिक असतो, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
5/7
रजोनिवृत्तीपूर्वी महिलांमध्ये इस्ट्रोजन हार्मोनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे स्त्रियांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा धोका कमी असतो.
advertisement
6/7
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. याला दोघांमधील जीवनशैलीत असणारा फरक हे एक कारण आहे. मात्र, रजोनिवृत्तीनंतर स्त्रिया आणि पुरुषांना हृदयविकाराचा धोका समान असतो, असे डॉक्टर सांगतात.
advertisement
7/7
हृदयविकार टाळण्यासाठी नियमित व्यायाम आणि आहाराची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. ताण-तणाव कमी राहिल्यास आजार होत नाहीत. त्यासाठी धुम्रपान आणि इतर व्यवसनांपासून दूर राहावं. त्यामुळे मधुमेह आणि हृदयविकारांचा धोका टाळता येतो, असंही डॉक्टर सपकाळ सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Care: महिला की पुरुष? हार्टअटॅकचा जास्त धोका कुणाला, तुम्हाला माहितीये का?