PCOD समस्या असणाऱ्या महिलांचा आहार कसा असावा? पाहा आहार तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हल्ली चुकीच्या जीवनपद्धतीमुळे महिलांमध्ये मासिक पाळीच्या संदर्भातील समस्या दिसून येतं आहेत. ज्या महिलांना PCOD आहे त्या महिलांनी आपला आहार नेमका कसा ठेवावा? पाहा
advertisement
1/6

हल्ली चुकीच्या जीवनपद्धतीमुळे महिलांमध्ये मासिक पाळीच्या संदर्भातील समस्या दिसून येतं आहेत. त्यातच PCOD आणि PCOS यांसारखे मासिक पाळीच्या संबंधित आजार महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतं आहेत.
advertisement
2/6
या कालावधीत काही महिलांचे वजन वाढते. ज्या महिलांना PCOD आहे त्या महिलांनी आपला आहार नेमका कसा ठेवावा? याविषयीचं <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यातील</a> आहार तज्ज्ञ ज्योती येणारे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/6
यात सकाळी आवळा जूस, कोरफड जूस यांसारख्या उपयुक्त वनस्पतीच्या पाण्याने दिवसाची सुरुवात करावी. तसेच या कालावधीत कडधान्य, पालेभाज्या, फळभाज्या यांचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश असणं गरजेचं आहे. या भाज्या बनवण्याची देखील एक वेगळी पद्धती असून तेलाचा वापर न करता तुम्ही गावरान तुपाचा वापर यामध्ये करू शकता, असं ज्योती येणारे सांगतात.
advertisement
4/6
या कालावधीत काही महिलांचे वजन वाढते परंतु अशापद्धतीच्या भाज्या खाल्ल्याने वजन वाढत नाही. त्याचप्रमाणे या काळात पाणी महत्त्वाची भूमिका बजावत. तुम्हाला शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवने फार महत्त्वाचे असते. तुम्ही पाण्यासोबतच ज्यूस, ताक हे देखील घेऊ शकता.
advertisement
5/6
ऋतुनूसर बाजारात मिळणारे कुठलेही फळ तुम्ही रोज खायला हवं. तुमच्या शरीराला उपयुक्त असणारे घटक तुम्हाला यातून मिळतील, असं ज्योती येणारे सांगतात.
advertisement
6/6
जेवणाच्या वेळा पाळल्या की आपले हार्मोन्स व्यवस्थित राहतात तसेच योगासन करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे हार्मोन्स बॅलन्स होण्यास मदत होते त्यासाठी व्यायाम देखील गरजेचा असल्याचं ज्योती येणारे यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
PCOD समस्या असणाऱ्या महिलांचा आहार कसा असावा? पाहा आहार तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला