'या' 5 गोष्टी पाहून दररोज खाल पॉपकॉर्न, काय काय फायदे आहेत एकदा वाचाच!
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
फ्री टाइम असो किंवा थिएटरमध्ये चित्रपट बघता बघता खूप वेळा सॉल्टी पॉपकॉर्नचा आनंद घेतला जातो. या पॉपकॉर्नचे शरीराला अनेक फायदे आहेत.
advertisement
1/5

टाइमपास पदार्थ म्हणून आपण पॉपकॉर्न खातो. फ्री टाइम असो किंवा थिएटरमध्ये चित्रपट बघता बघता खूप वेळा सॉल्टी पॉपकॉर्नचा आनंद घेतला जातो. कारण पॉपकॉर्नशिवाय या गोष्टी करायला मजाच येत नाही.
advertisement
2/5
पण कधी विचार केला आहात का हा टाइमपास म्हणून खाल्ला जाणारा पदार्थ आपल्या शरीरासाठी फायदेशीर पण असू शकतो. पॉपकॉर्न खाल्ल्याने शरीराला नक्की काय फायदे होतात? याबद्दलच <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईतील</a> आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/5
कमी तेलात आणि कमी मिठातले पॉपकॉर्न आपल्या शरीरासाठी आरोग्यदायी असतात. पॉपकॉर्नमध्ये ग्लासमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ते डायबिटीज असलेल्या लोकांसाठी उत्तम आहे. हे पॉपकॉर्न एक वाटी खाल्ल्यामुळे तुम्हाला भूकही लागणार नाही. आरोग्य देखील चांगले राहील. पॉपकॉर्नमध्ये फायबर असल्यामुळे ते आपल्या हृदयाच्या आजारांपासून अलिप्त ठेवते.
advertisement
4/5
त्याचबरोबर आपले रक्तदाब आटोक्यात ठेवण्याचे काम पॉपकॉर्न करते. पॉपकॉर्न मुळे भूक लागत नाही. कारणास्तव वजन कमी करण्यास मदत होते. शरीर सुदृढ बनते. पॉपकॉर्न मध्ये फायबरचे प्रमाण असल्यामुळे पोट देखील साफ होते. पॉपकॉर्न मध्ये फिनोलिक ऍसिड असते, जे अँटीऑक्सिडेंटचे काम करते.
advertisement
5/5
त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहते. रोज संध्याकाळच्या आहारात एक वाटी पॉपकॉर्न खाणे कधीही चांगले असते. शरीराचा आरोग्य समतोल नीट ठेवण्यासाठी दिवसातून एक वाटी पॉपकॉर्न खाणे चांगले ठरेल. त्याचबरोबर शरीर सुदृढ बनेल, अशी माहिती आरती भगत यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
'या' 5 गोष्टी पाहून दररोज खाल पॉपकॉर्न, काय काय फायदे आहेत एकदा वाचाच!