शोभेची झाडं लावण्यापेक्षा कुंडीत लावा 'ही' औषधी रोपं, आजार राहतील कोसो दूर!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती असतात, परंतु आपल्याला केवळ त्यांचे फायदे माहित नसतात इतकंच. याच वनस्पतींच्या सान्निध्यात राहून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. अनेकजणांना घराच्या खिडकीत, अंगणात रोपलागवड करण्याची आवड असते, बहुतेकजण शोभेच्या झाडांची लागवड करतात. परंतु त्याच जागी जर आपण उपयुक्त झाडं लावली, तर आपलं व आपल्या प्रियजनांचं आरोग्य उत्तम राहू शकतं. (सौरभ वर्मा, प्रतिनिधी)
advertisement
1/5

पानफुटीच्या रोपाची लागवड आपण सहजपणे कुंडीत करू शकता. हे रोप आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे शरिरातले सर्व जंतू नष्ट होतात. विशेषतः हे रोप मूतखड्यावर रामबाण असतं. म्हणूनच त्याला हिंदीत पत्थरचट्टा म्हणतात.
advertisement
2/5
तुळस आरोग्यदायी असते हे काही वेगळं सांगायला नको. तुळशीत अनेक आरोग्यपयोगी गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीर सुदृढ राहतं. म्हणूनच घरात किमान तुळशीचं रोप असावं, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
advertisement
3/5
कांडवेलीचं रोपही आरोग्यासाठी फायदेशीर असतं. विशेषतः यामुळे हाडांमध्ये लवचिकता येते, तसंच अंगदुखीवर आराम मिळतो. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असं हे रोप घरात असायलाच हवं.
advertisement
4/5
अश्वगंधाच्या रोपात अनेक आरोग्यपयोगी गुणधर्म असतात. हे रोप विशेषतः मेंदूसाठी आवश्यक आहे. यात असलेले अँटीऑक्सिडंट, अँटीइंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आहे, तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/vegetarian-dish-that-taste-better-than-meat-is-also-good-for-diabetes-mhij-1187245.html">आरोग्यासंबंधित</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/drinking-cold-water-can-be-harmful-for-heart-health-mhij-1187125.html">तज्ज्ञांचा सल्ला</a> घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी <a href="https://news18marathi.com/maharashtra/jalna/how-farmers-should-check-germination-capacity-of-seeds-see-in-marathi-video-mnkj-1187052.html">जबाबदार</a> नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
शोभेची झाडं लावण्यापेक्षा कुंडीत लावा 'ही' औषधी रोपं, आजार राहतील कोसो दूर!