उन्हाळ्यात डोळ्यांत आग आणि जळजळ होतेय? मग अशी घ्या काळजी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Amita B Shinde
Last Updated:
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना डोळ्यांचा त्रास होतो. अशावेळी आपण घरगुती उपाय करून डोळ्यांची काळजी घेऊ शकतो.
advertisement
1/7

डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे. सध्याचे वाढणारे तापमान, धूळ आणि संपूर्ण उन्हाळ्यात दिसणारे प्रदूषण डोळ्यांना त्रासदायक ठरू शकते. तसेच विविध प्रकारच्या आजारांचा किंवा त्रासदायक समस्यांचा त्यामुळे सामना करावा लागू शकतो.
advertisement
2/7
उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करणे आणि संपूर्ण उन्हाळ्यात त्यांना ताजेतवाने ठेवणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी उन्हाळ्यात आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? यासंदर्भात वर्धा येथील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रणय शिंदे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांना डोळ्यांची एलर्जी होते. डोळे चुरचूरणे, डोळे खाजवणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळे लाल होणे अशा प्रकारच्या समस्या अनेकांना सतावत असतात.
advertisement
4/7
अनेक लोकांना फेब्रुवारी, मार्च, एप्रिल याच दिवसांमध्ये ही लक्षणे किंवा समस्या दिसतात. याचं कारण म्हणजे ऍलर्जी कंजेक्टीवायसिस होय. अनेकजण अशा प्रकारचे त्रास झाल्यास स्वतः मेडिकल मध्ये जाऊन एक ड्रॉप विकत आणतात आणि तो डोळ्यात टाकतात. मात्र हे अतिशय घातक असू शकते, असे डॉक्टर सांगतात.
advertisement
5/7
ऍलर्जी कंजेक्टीवायसिस हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याचे ट्रीटमेंट्स सुद्धा वेगवेगळ्या असतात. अनेकजण आपल्या मनाने ड्रॉप टाकतात. ते स्टिरॉइड ड्रॉप असतात. त्याने तात्पुरता आराम मिळतो. मात्र अशाप्रकारे सतत वर्षानुवर्षं हे ड्रॉप्स वापरल्याने किंबहुना असे केल्याने डोळ्यांना काचबिंदू किंवा मोतीबिंदू होण्याची शक्यता वाढते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेतलं तर डॉक्टर त्यावर योग्य ट्रीटमेंट देतील आणि डोळ्यांची हानी होणार नाही, असे डॉ. शिंदे सांगतात.
advertisement
6/7
अनेकदा उन्हाळ्यात आपल्या डोळ्याला आग झाल्यासारखं किंवा डोळे जळल्यासारखं होतं. डोळ्यातून गरम वाफा निघल्यासारखं वाटतं. अशावेळी आपण घरगुती उपाय म्हणून फक्त डोळ्यावर स्वछ, थंड पाणी मारायचं. या कारणासाठी ड्रॉप टाकायची गरज नाही.
advertisement
7/7
डोळ्यांना आराम मिळावा म्हणून बाहेर निघताना चांगले गॉगल्स वापरणे अत्यंत महत्त्वाचं आहे. गॉगलमुळे डोळ्याला सूर्याचे किरण डायरेक्ट लागणार नाही आणि कुठलाही कचरा डोळ्यात जाणार नाही. त्यामुळे डोळे सुरक्षित राहण्यास मदत होईल. तर सगळे उपाय केल्यानंतर जर डोळे त्रास देत असतील तर आपल्या मनाने ड्रॉप खरेदी न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरावा, असाल सल्ला डॉक्टर देतात. (अमिता शिंदे, प्रतिनिधी)