शरिराची रोगप्रतिकारक शक्ती राहील उत्तम, ड्रॅगन फ्रूट खाण्याचे काय आहेत फायदे?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
ड्रॅगन फ्रुटमध्ये प्रोटिन्स, कार्ब्स, फायबर, लोह, मॅग्नेशियम अशा आरोग्यासाठी पोषक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे या फळातून आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
advertisement
1/8

आहारात फळांचा समावेश असायला हवा, असा सल्ला आहारतज्ज्ञ अगदी लहान मुलांपासून सर्व वयोगटातील व्यक्तींना देतात. फळांमधून शरिराला विविध पोषक तत्त्व मिळतात. ज्यामुळे निरोगी राहता येतं. परंतु काही फळं आपल्याला बाजारात दिसतात, ताजी असतात, त्यांचा रंग चांगला असतो.
advertisement
2/8
त्यांची किंमत परवडणारी असते, मात्र केवळ आपल्याला त्यांबाबत माहिती नसते म्हणून आपण ते फळ विकत घेत नाही. ड्रॅगन फ्रुटही यापैकीच एक. आज आपण या फळाचे फायदे जाणून घेणार आहोत तेही आहारतज्ज्ञांकडून.
advertisement
3/8
ड्रॅगन फ्रुटमध्ये प्रोटिन्स, कार्ब्स, फायबर, लोह, मॅग्नेशियम अशा आरोग्यासाठी पोषक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे या फळातून आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आजारपणापासून शरिराचं रक्षण होतं. हे फळ आरोग्यासाठी नेमकं कसं फायदेशीर आहे, याबाबत आहार सल्लागार डॉक्टर अमृता महेश कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
4/8
ड्रॅगन फ्रुट हे नैसर्गिकरित्या फॅट फ्री आणि भरपूर फायबर असलेलं फळ आहे. म्हणूनच ते नाश्त्यासाठी उत्तम असतं. ड्रॅगन फ्रुट खाल्ल्यानंतर पोट बराच वेळ भरलेलं राहतं. लवकर भूक लागत नाही. ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. शिवाय यात असलेल्या प्रोबायोटिक्समुळे आतड्यांमधील चांगल्या-वाईट बॅक्टेरियाचं संतुलन राखण्यास मदत होते. परिणामी अन्नपचन व्यवस्थित होतं.
advertisement
5/8
ड्रॅगन फ्रुटमध्ये आरोग्यपयोगी जीवनसत्त्व आणि खनिजं भरपूर असतात, तर यात कॅलरीजचं प्रमाण कमी असतं. तसंच यात फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक्स, इत्यादी अँटिऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे शरिराचं विविध आजारांपासून रक्षण होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रॅगन फ्रूटमुळे रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
advertisement
6/8
ड्रॅगन फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाणही चांगलं असतं, ज्यामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते. ड्रॅगन फ्रुट लोहाचाही चांगला स्रोत आहे. शरिरातली ऑक्सिजनची पातळी योग्य राहण्यासाठी लोह आवश्यक असतं, जे ड्रॅगन फ्रुटमधून मिळतं. परिणामी या फळामुळे शरीर ऊर्जावान राहतं.
advertisement
7/8
ड्रॅगन फ्रुटमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनसंस्था सुरळीत राहते. त्यामुळे पोटाचं आरोग्य निरोगी राहतं. शिवाय बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्याचबरोबर शरिरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास हे फळ खाणं फायदेशीर ठरतं.
advertisement
8/8
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
शरिराची रोगप्रतिकारक शक्ती राहील उत्तम, ड्रॅगन फ्रूट खाण्याचे काय आहेत फायदे?