TRENDING:

Litchi Benefits: भरपूर पोषक घटक, हृदय राहील चांगले, लिची खाण्याचे शरीराला फायदेच फायदे

Last Updated:
लिची खाण्याचे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायदे होतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि फायबर असतात आणि हे घटक आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरतात.
advertisement
1/7
भरपूर पोषक घटक, हृदय राहील चांगले, लिची खाण्याचे शरीराला फायदेच फायदे
पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये सर्वत्रच बाजारात मोठ्या प्रमाणात लिची ही विक्रीसाठी येत असते. लिची खाण्याचे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायदे होतात.
advertisement
2/7
यामधून भरपूर प्रमाणात पोषक घटक हे आपल्या शरीराला मिळत असतात. तर लिची खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात आणि कोणी खावी किंवा कोणी खाऊ नये? या सर्वांविषयी आपल्याला माहिती आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी दिली आहे.
advertisement
3/7
लिचीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक हे असतात. लिचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. आपण सर्वांनी पावसाळ्यामध्ये लिची खायला हवी.
advertisement
4/7
लिचीमध्ये व्हिटॅमिन सी फायबर हे घटक असतात आणि यामधून आपल्या त्वचेला देखील याचा खूप फायदा मिळतो. तसंच आपल्या हृदयासाठी देखील लिची खाणं चांगलं असतं.
advertisement
5/7
यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि फायबर असतात आणि हे घटक आपल्या हृदयासाठी फायदेशीर ठरतात.तसंच हाडे मजबूत करायला देखील लिची मदत करते.
advertisement
6/7
यामध्ये फायबर, कॅल्शियम हे घटक असतात ते फायदेशीर ठरतात. तसेच ज्यांना मधुमेह अशा रुग्णांनी लिची कमी प्रमाणात खावी कारण की त्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर असते. त्यामुळे तुम्ही लिची खाताना ती प्रमाणातच खावी, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलं.
advertisement
7/7
जर तुम्हाला दररोज लिची खायची असेल तर तुम्ही ती चांगल्या क्वालिटीची आणावी व्यवस्थित स्वच्छ धुऊन खावी कारण की त्यामध्ये अळ्या असण्याचे प्रमाण असू शकतं. तसेच खाताना ती नैसर्गिक पद्धतीनेच खावी म्हणजेच की त्याचा कुठल्याही प्रकारचा ज्यूस किंवा इतर वेगळ्या प्रकारे ते तुम्ही खाऊ नये, असंही आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Litchi Benefits: भरपूर पोषक घटक, हृदय राहील चांगले, लिची खाण्याचे शरीराला फायदेच फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल