Heart Attack : हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो! 'या' लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं तर वाचू शकतात प्राण
- Published by:Devika Shinde
Last Updated:
हार्ट अटॅकपूर्वी दिसणारी काही सामान्य लक्षणं दिसतात, हे संकेत लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
1/9

हार्ट अटॅक</a> हा आजार झपाट्याने वाढताना दिसतो. कमी वयातही अनेकांना हा आजार घेरतोय, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता प्रत्येकानेच स्वतःची काळजी घेणं, आणि हृदयाशी संबंधित संकेत ओळखणं अत्यंत महत्त्वाचं झालं आहे." width="1200" height="900" /> आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक हा आजार झपाट्याने वाढताना दिसतो. कमी वयातही अनेकांना हा आजार घेरतोय, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता प्रत्येकानेच स्वतःची काळजी घेणं, आणि हृदयाशी संबंधित संकेत ओळखणं अत्यंत महत्त्वाचं झालं आहे.
advertisement
2/9
डॉक्टरांच्या मते हार्ट अटॅक अचानक होत नाही. त्याआधी शरीर काही संकेत देतं. हे लक्षणं वेळेत ओळखून त्वरित उपचार घेतले, तर मोठं संकट टाळता येऊ शकतं.
advertisement
3/9
हार्ट अटॅकपूर्वी दिसणारी काही सामान्य लक्षणं दिसतात, हे संकेत लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
4/9
छातीत वेदना किंवा जडपणा – काही सेकंदांपेक्षा जास्त वेळ टिकणारी वेदना हे गंभीर संकेत असू शकतात.श्वास घेण्यात त्रास – थोडं चाललं किंवा जिना चढला तरी दम लागत असेल, तर हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं.असामान्य थकवा – पुरेशी विश्रांती घेतली तरी शरीर थकलेलं वाटतं.
advertisement
5/9
खांदा, पाठ किंवा जबड्यात वेदना – ही वेदना अनेकदा हार्ट अटॅकपूर्वी जाणवते.चक्कर येणं किंवा घाम येणं – अचानक जास्त घाम येणं किंवा चक्कर येणं हेही धोक्याचं चिन्ह आहे.
advertisement
6/9
काय करावं?अशी लक्षणं दिसताच लगेच जवळच्या डॉक्टरांकडे जावं. तपासणी करून घ्यावी. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत घेतलेली काळजीच प्राण वाचवू शकते.
advertisement
7/9
बचावासाठी जीवनशैलीत बदलसंतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, ताण-तणाव कमी ठेवा, धूम्रपान आणि मद्यपान टाळा, नियमित हेल्थ चेकअप करा,
advertisement
8/9
आजकाल हार्ट अटॅक हा केवळ ज्येष्ठांचा आजार राहिलेला नाही. त्यामुळे तरुणांनाही जागरूक राहणं आवश्यक आहे. शरीराने दिलेल्या छोट्या छोट्या संकेतांकडे वेळीच लक्ष दिलं, तर आपलं हृदय दीर्घकाळ निरोगी राहू शकतं.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Heart Attack : हार्ट अटॅक टाळता येऊ शकतो! 'या' लक्षणांकडे वेळीच लक्ष दिलं तर वाचू शकतात प्राण