इथं मिळतो स्पेशल हलवा, खाऊन तोंड गोड नाही, होतं तिखट; कानातून येतो धूर!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
हलवा म्हटलं की, डोळ्यासमोर येतो गाजर हलवा, दूधी हलवा आणि मूग डाळीचा हलवा. हे तीनही पदार्थ अत्यंत गोड आणि स्वादिष्ट असतात. थंडीत तर गरमागरम हलवा खाणं म्हणजे आहाहा! पण तुम्ही कधी तिखट हलवा खाल्लाय का? एवढा तिखट की, तुमच्या नाकातून पाणी आणि कानातून धूर येईल.
advertisement
1/6

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एक फेमस मिठाईचं दुकान आहे. तिथे एक नाही, दोन नाही, तर तब्बल 20 प्रकारचे हलवे मिळतात, पण गोड नाही तर त्यांची चव असते तिखट.
advertisement
2/6
हलव्याचं नाव ऐकताच आपल्या तोंडात पाणी येतं. आपण रव्याचा हलवाही आवडीने खातो. परंतु लखनऊच्या या दुकानात चक्क मिरचीचा हलवा मिळतो. इथल्या प्रत्येक हलव्यात खवा आणि मिरची असते.
advertisement
3/6
इथला हलवा खाऊन अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. परंतु तरीही 300 रुपये किलोचा हिरव्या मिरचीचा हलवा अनेकजण आवडीने खरेदी करतात. इतकंच नाही, तर इथं ड्रायफ्रूटचा हलवा 6000 रुपयांनाही मिळतो.
advertisement
4/6
या दुकानात केवळ मिरचीचाच हलवा मिळत नाही, तर गाजर, अक्रोड, चॉकोलेट, मूग डाळ, संत्र, ब्लूबेरी, नारळ, बदाम, पिस्ता, गुलाब, मेवा, इत्यादी विविध प्रकारचे हलवे मिळतात. ते तिखट असले तरीही त्यांची किंमत 500 रुपयांपेक्षाही जास्त असते.
advertisement
5/6
इथं येणारे ग्राहक या हलव्यांच्या चवीबाबत आश्चर्य व्यक्त करतात. ते म्हणतात, आधी कधीच असा हलवा खाल्ला नाही. मूळात तिखट हलवा ही संकल्पनाच फार वेगळी आहे.
advertisement
6/6
या दुकानाचं नाव आहे छप्पन भोग. इथले मार्केटिंग हेड क्षितिज सांगतात की, थंडीत इथल्या हलव्यांना प्रचंड मागणी असते. या हलव्यांची चव तिखट असली, तरी त्यांमुळे पोटाचा कोणताही विकार होत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
इथं मिळतो स्पेशल हलवा, खाऊन तोंड गोड नाही, होतं तिखट; कानातून येतो धूर!