TRENDING:

Health Tips: चाळीशी आलीये, बिनधास्त राहा; फॉलो करा ‘या’ टिप्स, आजारपण पळेल दूर

Last Updated:
Diet tips to be healthy after 40 in Marathi: चाळीशीनंतर विविध प्रकारचे आजार डोकं वर काढू लागतात. त्यामुळे चाळीशीपासून आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. जाणून घेऊयात आयुष्याच्या ‘या’ विशेष टप्प्यात स्वत:ला फिट ठेवण्यासाठीच्या काही टिप्स्, ज्यामुळे तुम्ही म्हातारपणातही निरोगी राहू शकाल.
advertisement
1/7
Health Tips: चाळीशी आलीये, बिनधास्त राहा; फॉलो करा ‘या’ टिप्स, आजारपण पळेल दूर
चाळीशी हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. काही जण, त्याचं वय झालं, म्हातारपण जवळ येऊ लागलं म्हणून नाराज होतात तर काही जण आयुष्यातल्या नव्या टप्प्याची सुरूवात होते म्हणून आनंदी होतात. मात्र प्रत्येकाला चाळीत आरोग्याची काळजी घेण्याची गरज असते.
advertisement
2/7
वाढत्या वयाबरोबर शरीरिक आणि मानसिक आरोग्यातही बदल होऊ लागतात. वयाच्या चाळीशी नंतर डोळ्याचे आजार, हृदविकार, डायबिटीस अशा आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे चाळीशीपासून स्वत:ला फिट ठेवण्यासाठी पोषक आहार, हलका व्यायाम करण्याची गरज आहे.
advertisement
3/7
वयाच्या चाळीशी नंतर दरवर्षी नियमितपणे आरोग्य तपासणी करण्याची गरज आहे. गंभीर आजारांचं निदान होऊन योग्य ते औषधोपचार करणं शक्य होतं.
advertisement
4/7
बदलत्या जीवनशैलीमुळे डायबिटीसने अनेकांना तरूणपणीच विळखा घातला आहे. तुम्हाला चाळीशीपर्यंत डायबिटीसची लागण नसेल झाली तर तुम्ही भाग्यवान असू शकता. मात्र मला काही होणार नाही या भ्रमात राहू नका. चाळीशीनंतर दर 6 महिन्यांनी HbA1c आणि आवश्यक त्या रक्ततपासण्या कराव्या.
advertisement
5/7
या वयात मानसिक आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचं ठरतं. हा आपल्या वयाचा असा टप्पा असतो की कौटुंबिक किंवा व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे आपले माघारी फिरण्याचे रस्ते बंद झालेले असतात. त्यामुळे तणाव आणि चिंता वाढू लागतात. जर योग्य पद्धतीने या गोष्टी हाताळल्या गेल्या नाही तर त्याचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.
advertisement
6/7
या वयात शरीर सक्रिय ठेवणं खूप गरजेचे आहे. नियमित व्यायामाने शरीर तर तंदुरुस्त राहतेच पण मनही प्रफुल्लीत व्हायला मदत होते. चाळीशी नंतर दिवसभरात किमान 30 मिनिटांचा हलका व्यायाम करणं महत्त्वाचं ठरतं.
advertisement
7/7
आधी सांगितल्या प्रमाणे चाळीशीनंतर पचनक्रिया मंदावते. त्यामुळे अरबट चरबट खाण्यापेक्षा सकस आणि पौष्टिक आहार घेणं महत्त्वाचं ठरतं. खाण्याच्या चांगल्या सवयींची अवलंब नाही केल्यास पचनाचे विकार होण्याची भीती असते. त्यामुळे फास्ट फूड आणि जंक फूड टाळून आहारात ताजी फळं, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips: चाळीशी आलीये, बिनधास्त राहा; फॉलो करा ‘या’ टिप्स, आजारपण पळेल दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल