TRENDING:

पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत? टेन्शन घेऊ नका, फाॅलो करा 'या' सोप्या टिप्स; येणार नाही कुबट वास 

Last Updated:
पावसाळ्यात कपडे घरात वाळवताना अनेक अडचणी येतात. वातावरणात आर्द्रता जास्त असल्यामुळे कपडे लवकर सुकत नाहीत आणि त्यातून दुर्गंधी येते. ही समस्या टाळण्यासाठी कपडे...
advertisement
1/6
पावसाळ्यात कपडे वाळवण्याचे 'हे' जुगाड तुम्हाला माहीत आहेत का?
पावसाळा सुरू झाला की इतर समस्या डोके वर काढतात. विशेषतः, धुतलेले कपडे सुकवताना अनेकांना खूप त्रास होतो. पावसाळा संपेपर्यंत लोकांना ही समस्या काही पाठ सोडत नाही, असे म्हणता येईल. कारण या काळात वातावरण खूप दमट असते. यामुळे कपडे लवकर सुकत नाहीत. कपडे लवकर कशी सुकवावीत, यासाठी खालील टिप्स फाॅलो करा...
advertisement
2/6
ओली कपडे घरात वाळत टाकलीत, तर हळूहळू घरातील दमटपणा वाढतो आणि भिंती खराब होतात. फरशांवर पाणी पडले तरी त्या लवकर खराब होतात. हा ओलावा वाढल्याने बॅक्टेरिया (जिवाणू) देखील वाढतात. त्यामुळे, जर तुम्ही काही खबरदारी घेतली, तर तुम्ही अशा समस्यांशिवाय तुमचे कपडे सुकवू शकता.
advertisement
3/6
कपडे धुतल्यानंतर तुम्ही ते थोडा वेळ बाहेर टाका. मात्र, तुमचे कपडे आणखी लवकर सुकावे असे वाटत असेल, तर ते शक्य तितके घट्ट पिळून घ्या आणि कपड्यातील सर्व पाणी बाहेर पडले आहे याची खात्री करा. यामुळे कपड्यातील सर्व पाणी लवकर सुकण्यास मदत होईल.
advertisement
4/6
हेअर ड्रायरचा वापर करूनही तुम्ही कपडे वाळवू शकता. फक्त हेअप ड्रायर कपड्यांपासून थोडे दूर ठेवणे चांगले. यामुळे तुमचे ओले कपडे खूप लवकर सुकतील. फॅनचा वापर करूनही तुम्ही कपडे आरामात सुकवू शकता. त्यासाठी टेबल फॅन वापरणं योग्य आहे.
advertisement
5/6
तुमचे कपडे खूप ओले असतील, तर त्यांना लगेच इस्त्री करा. यामुळे कपड्यातील ओलावा आणि कुबट वास कमी होईल. यामुळे तुम्हाला ओले कपडे सुकवणे सोपे होईल. पण लक्षात ठेवा की ही युक्ती सर्व कपड्यांवर काम करणार नाही. ही पद्धत विशेषतः पॉलिस्टर कपड्यांसाठी चांगली नाही.
advertisement
6/6
(टीप : हा लेख इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या अहवाल आणि माहितीवर आधारित आहे. News18Marathi याचा भाग नाही आणि यासाठी जबाबदार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
पावसाळ्यात कपडे लवकर वाळत नाहीत? टेन्शन घेऊ नका, फाॅलो करा 'या' सोप्या टिप्स; येणार नाही कुबट वास 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल