TRENDING:

Chef Kitchen Tips : बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून काय करायचं? मास्टर शेफ पंकजने दिला उपाय

Last Updated:
How to Store Potato Without Sprout : कोंब आलेले बटाटे आरोग्यासाठी हानिकारक, खाऊ नयेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. मग बटाट्यांना कोंब येऊच नयेत, यासाठी काय काळजी घ्यायची हे शेफनी सांगितलं आहे.
advertisement
1/6
बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून काय करायचं? मास्टर शेफ पंकजने दिला उपाय
तुम्ही कुठेही जा बटाटा प्रत्येक घरात असतो. बटाट्याची भाजी असो वा आणखी काही, बटाट्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. बटाटाच्या बाबतीत तुम्ही एक गोष्टी पाहिली असेल की बटाट्यांना कोंब येतात आणि ते वापरायचे असतील तर आपण ते काढतो आणि मग वापरतो. पण असे कोंब आलेले बटाटे खाऊ नयेत, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
advertisement
2/6
कृषी तज्ज्ञांच्या मते, बटाटे जास्त काळ प्रकाश, उष्णता किंवा दमट वातावरणात ठेवले गेले तर त्यांच्यात नैसर्गिकरित्या काही विषारी घटक तयार होऊ लागतात. या घटकांना ‘ग्लायकोअल्कलॉइड’ असं म्हटलं जाते. त्यामध्ये सोलानाइन आणि चाकोनाइन हे दोन घटक विशेषतः घातक मानले जातात. बटाट्याचा रंग हिरवट होणे किंवा त्याला अंकुर फुटणं म्हणजे त्यामध्ये या विषारी द्रव्यांचे प्रमाण वाढल्याचं लक्षण असतं.
advertisement
3/6
अंकुरलेले किंवा हिरवे बटाटे खाल्ल्यानंतर त्याचे परिणाम काही तासांतच दिसून येऊ शकतात. सुरुवातीला पोटात जडपणा, जळजळ आणि मळमळ जाणवते. त्यानंतर उलट्या, पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास होऊ शकतो. काही लोकांना चक्कर येणे, डोकेदुखी आणि तीव्र अशक्तपणा जाणवतो. गंभीर परिस्थितीत ताप येणे, शरीरातील पाणी कमी होणे तसेच मज्जासंस्थेवर परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आधीपासून आजार असलेल्या लोकांसाठी हा धोका अधिक गंभीर ठरतो.
advertisement
4/6
अनेकांना असं वाटतं की बटाटे उकळून, तळून किंवा नीट शिजवून घेतल्यास त्यातील विषारीपणा नष्ट होतो. मात्र, हा एक मोठा गैरसमज आहे. सोलानाइनसारखी विषारी संयुगे उच्च तापमानातही पूर्णपणे नष्ट होत नाहीत. त्यामुळे शिजवलेले असले तरी अंकुरलेले किंवा हिरवे बटाटे आरोग्यास हानीकारक ठरू शकतात. म्हणूनच पोषणतज्ज्ञ आणि डॉक्टर असे बटाटे वापरण्याचा सल्ला देत नाहीत.
advertisement
5/6
पण मग बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून काय करायचं? तर मास्टर शेफ पंकज यांनी यावर उपाय दिला आहे. त्यांनी सांगितलं की बटाटे साठवणुकीत सगळे एक चूक करतात ती म्हणजे बटाटे आणि कांदे एकत्र साठवणं. यामुळे बटाटे आणि कांदे दोन्ही खराब होतात. बटाट्यांना असे कोंब येतात. त्यामुळे बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून सगळ्यात आधी बटाटे आणि कांदे वेगवेगळे ठेवा.
advertisement
6/6
याशिवाय बटाटे नेहमी थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागेत ठेवावेत. थेट सूर्यप्रकाश किंवा कृत्रिम प्रकाशापासून त्यांना दूर ठेवणं महत्त्वाचं आहे. प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बटाटे साठवण्याऐवजी कागदी किंवा ज्यूटच्या पिशव्यांचा वापर करावा, जेणेकरून हवा खेळती राहिल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chef Kitchen Tips : बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून काय करायचं? मास्टर शेफ पंकजने दिला उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल