TRENDING:

Mood Boosting Foods: मूड नाहीये? मग खा ‘हे’ पदार्थ; वाटेल फ्रेश,व्हाल रिफ्रेश

Last Updated:
Benefits of Mood Boosting Foods in Marathi: अनेकदा आपला मूड खराब झाला की, राग येऊ लागतो. अनेक गोष्टी नकोशा वाटू लागतात. रागाच्या भरात आपण काय बोलून जातो, काय करतो हे सांगता येत नाही. तुम्हाला आलेल्या रागाचं रूपांतर रौद्रावतारात नसेल करायचं तर मूड सुधारण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नसतो.मात्र मूड सुधारण्यासाठी वेळ लागू शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जर काही पदार्थ खाल्ले तर तुमचा मूड हा सुधारू शकतो. खोटं वाटतंय जाणून घेऊयात कोणते पदार्थ खाल्ल्याने तुमचा मूड सुधारू शकतो ते.
advertisement
1/7
Mood Boosting Foods: मूड नाहीये? मग खा ‘हे’ पदार्थ; वाटेल फ्रेश,व्हाल रिफ्रेश
डार्क चॉकलेटमध्ये असलेल्या फ्लेव्होनॉइड्समुळे सेरोटोनिनची पातळी वाढून नैराश्याची लक्षणे कमी होतात. चॉकलेट हे सर्वांनाच आवडतं आणि ते सहज उपलब्ध होतं. त्यामुळे एखाद्या कोणत्या गोष्टीमुळे तुमचा मूड खराब झाला असेल तर चॉकलेट खाल्ल्याने तो मूड सुधारायला मदत होईल.
advertisement
2/7
केळ्यांमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन बी 6 असतं. जे डोपामाइन आणि सेरोटोनिन सारख्या फील-गुड न्यूरोट्रांसमीटरच्या उत्पादनास मदत करतं.केळ्यात असलेल्या फायबर्समुळे पोटही भरल्यासारखं राहतं त्यामुळे भूकेमुळे होणारी चिडचिडही कमी होते.
advertisement
3/7
प्रोबायोटिक्स नैराश्यावर उपचार करण्यास मदत करू शकतात. आंबवून तयार केलेले पदार्थ प्रोबायोटिक्सने भरलेले असतात. त्यामुळे तुमचा मूड खराब असेल तर इडली, डोसा खाल्ल्याने मूडही चांगला होईल. मूड चांगला करण्यासाठी दही खाणं किंवा लस्सी पिणं हा सुद्धा एक चांगला पर्याय आहे.
advertisement
4/7
सुकामेव्यात ट्रिप्टोफेन नावाचं अमिनो ॲसिड असतं जे सेरोटोनिन वाढवण्यासाठी फायद्याचं असतं. त्यामुळे सुकामेवा खाल्ल्याने सेरोटोनिन वाढून मूड चांगला राहू शकतो. याशिवाय सुकामेव्यातून प्रोटिन्स, गुड फॅट आणि व्हिटॅमिन ई शरीराला मिळतात.
advertisement
5/7
रक्तातल्या साखरेत होत असलेल्या चढ-उतारामुळे मूडवर परिणाम होतो. ओट्स खाल्ल्याने शरीराला हळूहळू ऊर्जा मिळते आणि रक्तातली साखर नियंत्रित राहते. त्यामुळे मूडस्विंग्स कमी होतात.
advertisement
6/7
पालक भाजीच्या पानांमध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन बी ने समृद्ध असे घटक असतात, जे सेरोटोनिन आणि डोपामाइन वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे तुमचा मूड खराब असेल तेव्हा तुम्ही जेवणात पालकचा उपयोग केल्यास तुमचा मूड सुधारू शकतो.
advertisement
7/7
जेव्हा जेव्हा तुमचा मूड खराब असेल अशावेळी वर दिलेले पदार्थ खाऊन बघा, नक्कीच तुमचा मूड सुधारायला मदत होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mood Boosting Foods: मूड नाहीये? मग खा ‘हे’ पदार्थ; वाटेल फ्रेश,व्हाल रिफ्रेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल