Acidity Home Remedies: सतत होतोय ॲसिडिटीचा त्रास ? वापरा ‘या’ सोप्या टिप्स, ॲसिडिटी होईल ‘छूमंतर’
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Home Remedies for acidity in Marathi: पोटात किंवा घशात होणाऱ्या जळजळीला ॲसिडिटी असं म्हटलं जातं.ॲसिडिटीमुळे काहींच्या छातीत जळजळ होते. तर काहींना पोटात मळमळीचा त्रास जाणवू शकतो. ॲसिडिटीवर आत्ता औषधं जरी उपलब्ध असली तरीही काही सोप्या घरगुती टिप्स् वापरून ॲसिडिटीला दूर ठेवता येऊ शकतं. जाणून घेऊयात ॲसिडिटीला दूर करण्यासाठीचे सोपे घरगुती उपाय.
advertisement
1/7

अपुरी झोप हे ॲसिडिटीचं एक महत्त्वाचं कारण आहे. नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अनेकदा ॲसिडिटीचा त्रास होतो. ते तर नाईट शिफ्टला ॲसिडिटी शिफ्ट असंही म्हणतात. त्यामुळे कोणत्याही गोळ्या औषधांशिवाय ॲसिडिटीचा त्रास कमी करायाचा असेल तर पुरेशी झोप घ्या.
advertisement
2/7
तुमची झोपण्याची चुकीची पद्धत ॲसिडिटीचं कारण ठरू शकते. पाठीवर झोपल्‍याने ॲसिड रिफ्लक्‍सचा त्रास होऊ शकतो. उशी घेऊन डाव्‍या कुशीवर झोपल्‍याने ॲसिडिटीचा त्रास कमी होऊ शकतो.
advertisement
3/7
झोपण्‍यापूर्वी मसालेदार पदार्थांचं किंवा भरपेट खाणं टाळा. जेवल्यानंतर किमान 3 तासांनी झोपा जेणेकरून अन्न पचायला मदत होईल आणि ॲसिड रिफ्लक्‍सचा कमी होईल. झोपण्‍यापूर्वी मद्यपान करणं किंवा कॅफीन घेणं टाळा.
advertisement
4/7
ताण तणावामुळे ॲसिडिटी वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला सतत ॲसिडीटीचा त्रास होत असेल तर तणाव हे त्यामागचं एक कारण असू शकतं. तणावाचं कारण शोधून त्यावर उपाय शोधलात तर ॲसिडिटीचा त्रास कमी होईल.
advertisement
5/7
एकाच वेळी जास्त जेवण्यापेक्षा दिवसभरात थोडं थोडं खाल्यास पचनक्रिया सक्रिय राहून ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. चॉकलेट, लिंबूवर्गीय फळं, टोमॅटो यांसारख्‍या ॲसिडिटी वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करणं टाळा.
advertisement
6/7
नियमित व्‍यायाम आणि मानसिक आरोग्‍य उत्तम राखणाऱ्या योगासनांद्वारे तणाव कमी करता येऊ शकतो. व्यायाम आणि योगासनांमुळे ॲसिडिटी कमी व्हायाला मदत होते.
advertisement
7/7
तुम्‍हाला सतत गॅस्ट्रिक ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर स्वत:हून औषधं घेण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुमच्या ॲसिडिटीच्या कारणांचं मूळ शोधून योग्य ती औषधं आणि व्यायाम सुचवतील ज्यामुळे ॲसिडिटीचा त्रास कमी होऊ शकेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Acidity Home Remedies: सतत होतोय ॲसिडिटीचा त्रास ? वापरा ‘या’ सोप्या टिप्स, ॲसिडिटी होईल ‘छूमंतर’