TRENDING:

Mangalsutra : काळा रंग अशुभ मानला जातो, मग मंगळसूत्रात काळ्या रंगाचे मणी का असतात?

Last Updated:
हिंदू धर्मात विवाहित महिला या लग्नानंतर गळ्यात मंगळसूत्र घालतात. लग्नानंतर विवाहित महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र असण्याला खूप महत्व असते. परंतु तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? की इतर वेळी काळा रंग अशुभ मानला जातो मग मंगळसुत्रात काळे मणीचं का असतात. मंगळसूत्रात काळे मणी असण्यामागील योग्य कारण जाणून घेऊयात.
advertisement
1/5
काळा रंग अशुभ, मग मंगळसूत्रात काळ्या रंगाचेच मणी का असतात?
सामान्यपणे मंगळसूत्रात सोन्याचे मणी, काळे मणी आणि सोन्याच्या दोन वाट्या असतात. कालांतराने मंगळसूत्रातील दोन वाट्यांची जागा पेंडंट्सने घेतली. परंतु मंगळसूत्रातील काळ्या मण्यांना अजूनही तितकेच महत्व आहे. काळ्या मण्यांशिवाय मंगळसूत्र अपूर्ण मानलं जात.
advertisement
2/5
काळ्या रंगाचे मोती हे भगवान शंकराचे प्रतीक असल्याचे मानले जाते. जेव्हा विवाहित स्त्री काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घालते तेव्हा तिला आणि तिच्या पतीला भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात.
advertisement
3/5
मंगळसूत्र हा महिलेचा सौभाग्य अलंकार आहे. तेव्हा वैवाहिक जीवनावर कोणाची वाईट नजर पडू नये, कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मंगळसूत्रात काळे मणी असतात अशी देखील मान्यता आहे.
advertisement
4/5
विवाहित महिलांना अनेकदा काळ्या रंगाच्या वस्तू घालण्यास मनाई केली जाते. परंतु हेच काळे मणी जेव्हा मंगळसूत्रात गुंफले जातात तेव्हा ते शुभ कार्य करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, काळे मणी राहू ग्रहाचे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतात. यामुळे शनीची वाईट नजर तुमच्या वैवाहिक जीवनावर पडत नाही असे म्हंटले जाते.
advertisement
5/5
मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांच्या जोडीला सोन्याचे मणी देखील असतात. सोन या धातूमध्ये हीलिंग गुणधर्म असतो, जो विवाहित महिलांना चिंता आणि ताणमुक्त ठेवतो. ज्योतिषशास्त्रानुसार, सोन परिधान केल्याने गुरूचा प्रभाव वाढवायला मदत होते आणि वैवाहिक जीवन सुखी होतं. ( सदर मजकूर हा इंटरनेटवर असलेल्या माहितीच्या आधारे आहे. याचा न्यूज १८ मराठीशी संबंध नाही. )
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mangalsutra : काळा रंग अशुभ मानला जातो, मग मंगळसूत्रात काळ्या रंगाचे मणी का असतात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल