Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिन संपल्यानंतर झेंड्याचं काय करायचं? प्रत्येकाला माहिती हवेत राष्ट्रध्वजाचे नियम
- Published by:Priya Lad
Last Updated:
Indian flag rule : तिरंग्याचा किंवा राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यासाठी गृहमंत्रालयाकडून काही नियम जारी करण्यात आले आहेत. ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971’नुसार काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.
advertisement
1/7

भारतीय ध्वज संहितेतल्या नियम 2.2 नुसार, कापडी राष्ट्रध्वज खराब झाल्यास किंवा त्याचा रंग फिका झाल्यास तो वापरणं टाळावं. असं न केल्यास तो तिरंग्याचा अपमान समजला जातो.
advertisement
2/7
राष्ट्रध्वजाचा वापर कोणत्याही प्रकारचा पोशाख वा गणवेश बनवण्यासाठी केला जाऊ नये. राष्ट्रध्वजावर काहीही लिहू नये.
advertisement
3/7
कोणतीही वस्तू गुंडाळण्यासाठी, पॅकिंगसाठी किंवा वाटप करण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर केला जाऊ नये.
advertisement
4/7
कोणत्याही वाहनाची बाजू, वरचा भाग किंवा मागची बाजू झाकण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर केला जाऊ नये.
advertisement
5/7
खासगी अंत्यसंस्कार करत असताना राष्ट्रध्वजाचा आच्छादन म्हणून वापर करता येत नाही.
advertisement
6/7
राष्ट्रध्वज खराब झाल्यास त्याचा अपमान होणार नाही अशा कोणत्याही पद्धतीने तुम्ही तो ध्वज नष्ट करू शकता.
advertisement
7/7
झेंडे कधीही जमिनीवर टाकू नयेत. वापर झाल्यानंतर एक तर हे झेंडे सांभाळून ठेवावेत किंवा मग वाहत्या पाण्यात ते समर्पित करावेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिन संपल्यानंतर झेंड्याचं काय करायचं? प्रत्येकाला माहिती हवेत राष्ट्रध्वजाचे नियम