Is banana beneficial in Winter?: हिवाळ्यात केळं खावं की नाही; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Is banana beneficial in Winter: केळं हे वर्षभर मिळणारं फळ आहे. केळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र अशी आरोग्यदायी केळी हिवाळ्यात खायची की नाही असा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात येतो. काहींच्या मते केळ्यात फायबर्स आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून हिवाळ्यात साथीच्या आजारांपासून बचाव होऊ शकतो. तर काहींच्या मते हिवाळ्यात केळी खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि कफाचा त्रास वाढू शकतो. जाणून घेऊयात हिवाळ्यात केळी खाण्याचे फायदे आणि तोटे आणि केळ्यांविषयी काही आश्चर्यकारक गोष्टी.
advertisement
1/9

केळी भारतात सहज उपलब्ध जरी असली तरीही तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, या फळांचा उगम भारतातला नसून आग्नेय आशियातील उष्णकटिबंधीय प्रदेशातला आहे. पापुआ न्यू गिनीमध्ये केळ्याचं पहिल्यांदा उत्पादन घेतल्याचं बोललं जातं.
advertisement
2/9
आपल्या सगळ्यांसाठी केळं हे झाडाला येणारं फळ जरी असलं शास्त्रीयदृष्ट्या केळी झाड नसून गवत आहे. मुसा जातीच्या गवताला आणि त्या गवताच्या फळाला केळं असं म्हणतात.
advertisement
3/9
केळ्याचं झाड एकदा लावल्यानंतर त्याच्या खोडाची जोमाने वाढ होते. पण त्या खोडाला पानं आणि फळं यायला वेळ लागतो. केळीच्या झाडाला आधी फुलं येतात, ज्यांना आपण केळफूल म्हणतो. या केळफुलाचं रूपांतर नंतर फळामध्ये होतो. झाड लावल्यानंतर त्याला केळ्याचे घड येण्यासाठी साधारण एक ते दीड वर्षाचा वेळ लागतो.
advertisement
4/9
अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की केळ्यामध्ये विविध जीवनसत्त्वे, पोषकत्त्वे आणि फायबर्स असतात, त्यामुळे ती आरोग्यासाठी फायद्याची असतात.
advertisement
5/9
हिवाळ्यात सर्दी, खोकला किंवा घशाचा संसर्ग असल्यास केळ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात. लहान मुलांना रात्रीच्या वेळी केळी देऊ नयेत. यामुळे मुलं आजारी पडण्याची भीती असते.
advertisement
6/9
हिवाळ्यात हृदयरोगाचा धोका वाढतो.केळ्यांमध्ये असलेले फायबर आणि पोटॅशियम हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर हिवाळ्यात केळी खाणं फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
7/9
केळ्यामध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, फायबर आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. केळी खाल्ल्याने हिवाळ्यात होणारा सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
advertisement
8/9
डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीसाठी केळं हे उत्तम फळ आहे. कारण त्यांना सतत गोड खाण्याची इच्छा होत असते. अशावेळी केळं खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते. त्यातल्या पोषक तत्त्वांचे शरीराला फायदे होतात. इतकंच काय तर केळी खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा मरून जाते.
advertisement
9/9
केळी हे थंड प्रवृत्तीचं फळ आहे. त्यामुळे रात्री केळी खाणं टाळा नाहीतर कफाचा त्रास होऊ शकतो. तुम्हाला जर दातांचा काही त्रास किंवा आजार असेल किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर केळी खाणं टाळा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Is banana beneficial in Winter?: हिवाळ्यात केळं खावं की नाही; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला