TRENDING:

Japanese Fever : जपानी तापाची कारणं काय, तो लहान मुलांनाच का होतो? पाहा लक्षणं आणि बचावाचे उपाय

Last Updated:
Japanese Fever Causes : हल्ली संसर्गजन्य आजार होण्यासारखे वातावरण असते. कधी पावूस कधी ऊन तर कधी थंडी यामुळे आधी अनेकांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असते. अशात काही घातक आजारांचा धोका वाढल्यास आरोग्य सांभाळणे कठीण होऊन बसते. त्यातही लहान मुलांना खूप जास्त जपावी लागते. असाच एक खूप घातक ताप आहे. जो सहसा लहान मुलांना जास्त प्रभावित करतो. तो म्हणजे जपानी ताप.
advertisement
1/6
जपानी तापाची कारणं काय, तो लहान मुलांनाच का होतो? पाहा लक्षणं आणि बचावाचे उपाय
जपानी एन्सेफलायटीस, याला जपानी ताप असेही म्हणतात. हा प्रामुख्याने क्युलेक्स डासाच्या चावण्यामुळे होतो. हा आजार टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. याशिवाय हा विषाणू पसरू नये म्हणून मच्छरदाणी वापरणे आवश्यक आहे.
advertisement
2/6
हा आजरा टाळण्यासाठी डासांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. म्हणूनच डासांची उत्पत्ती रोखली पाहिजे. त्यामुळे घराभोवती पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
3/6
जपानी तापाची लक्षणे : जपानी तापामुळे डोकेदुखी किंवा मेंदूच्या ऊतींना सूज येणे यासारख्या न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात. इतर लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे, थरथर कापणे आणि झटके येणे यांचा समावेश होतो. हा आजार खूप वाढत गेल्यास यामुळे अर्धांगवायू किंवा कोमाची परिस्थितीदेखील निर्माण होऊ शकते.
advertisement
4/6
हा ताप कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो परंतु 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये अधिक सामान्य आहे. या आजारात मृत्यूचे प्रमाण आणि शारीरिक आणि मानसिक अपंगत्व खूप जास्त आहे.
advertisement
5/6
जपानी ताप संसर्गजन्य नाही. या तापाची लक्षणे डास चावल्यानंतर 5 से 15 दिवसानंतर दिसतात. लहान मुलांना या तापापासून वाचवण्यासाठी व्हॅक्सिन देणे खूप आवश्यक आहे आणि डासांपासून बचाव करणे सर्वाधिक गरजेचे आहे.
advertisement
6/6
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Japanese Fever : जपानी तापाची कारणं काय, तो लहान मुलांनाच का होतो? पाहा लक्षणं आणि बचावाचे उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल