TRENDING:

Benefits of Apple: ‘इतक्या’ गंभीर आजारांवर गुणकारी आहे सफरचंद, रोज खाल्ल्याने दूर पळतील अनेक आजार

Last Updated:
Benefits of Apple: ‘An apple a day keeps the doctor away’ अशी इंग्रजीत म्हण आहे. साध्या सोप्या भाषेत या म्हणीचा अर्थ काढायचा म्हटला तर सफरचंदाचे इतके आरोग्यदायी फायदे आहेत की, रोज एक सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतील त्यामुळे एखादी व्यक्ती आजारी पडण्याची शक्यता नाही. जाणून घेऊयात सफरचंद खाण्याचे फायदे
advertisement
1/7
Benefits of Apple: सफरचंदाचे ‘इतके’ फायदे ?, रोज खाल्ल्याने दूर पळतील अनेक आजार
सफरचंदात असलेले फायबर्स आणि पॉलिफेनॉल रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात. त्यामुळे हायब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्या रूग्णांनी रोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
advertisement
2/7
सफरचंदात पॉलिफेनॉल क्वेर्सेटिन हे जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे रक्तातही साखर नियंत्रणात राहायला मदत होते. सफरचंदाच्या नियमित सेवनाने टाइप-2 डायबिटीसचा धोकाही कमी होण्यास मदत होते.
advertisement
3/7
सफरचंदात पेक्टिन नावाचं एक प्रकारचा फायबर असतं. जे पोटाच्या आरोग्यासाठी फायद्याचं आहे. पेक्टिनमुळे निरोगी बॅक्टेरिया, बॅक्टेरॉइडेट्सचं प्रमाण वाढतं. त्यामुळे खाल्लेलं जेवण सहज पचतं. आतड्यांवर फार ताण न आल्यामुळे आतड्याचं आरोग्य सुधारतं.
advertisement
4/7
सफरचंदांमध्ये पॉलीफेनॉल अँटिऑक्सिडेंट असतात. त्यामुळे फुफ्फुसं, पचनसंस्था आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
advertisement
5/7
सफरचंदात असलेले अँटी-ऑक्सिडंट्स मेंदूला ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवू शकतात. त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी सफरचंद खाणं फायद्याचं आहे.
advertisement
6/7
कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी सफरचंद हा एक उत्तम नैसर्गिक पर्याय ठरू शकतो. सकाळी सफरचंद खाल्ल्याने शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्टेरॉल (LDL Cholesterol) झपाट्याने कमी होऊ शकतं.
advertisement
7/7
सफरचंद खाल्ल्याने रक्तवाहिन्या शिथिल होऊन रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे हार्ट ॲटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Benefits of Apple: ‘इतक्या’ गंभीर आजारांवर गुणकारी आहे सफरचंद, रोज खाल्ल्याने दूर पळतील अनेक आजार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल