TRENDING:

Alcohol : कारमध्ये दारूच्या बाटल्या घेऊन फिरताय? 'हा' नियम माहीत नसेल तर पोलीस करतील कारवाई

Last Updated:
carrying alcohol in car maharashtra :काहीजण आपल्या कारमधून पार्टीच्या ठिकाणी किंवा फार्म हाऊसवर जाताना मद्यसाठा सोबत नेतात. मात्र, आनंदाच्या भरात आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो, ती म्हणजे महाराष्ट्रातील कडक अबकारी नियम.
advertisement
1/9
कारमध्ये दारूच्या बाटल्या घेऊन फिरताय? नियम माहीत नसेल तर पोलीस करतील कारवाई
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री अनेकजण मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन करतात. काहीजण आपल्या कारमधून पार्टीच्या ठिकाणी किंवा फार्म हाऊसवर जाताना मद्यसाठा सोबत नेतात. मात्र, आनंदाच्या भरात आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो, ती म्हणजे महाराष्ट्रातील कडक अबकारी नियम.
advertisement
2/9
महाराष्ट्रात दारू बाळगणे, वाहून नेणे किंवा पिणे यासाठी 'महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949' (Maharashtra Prohibition Act, 1949) अंतर्गत काही विशिष्ट नियम आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास तुमची गाडी जप्त होऊ शकते आणि तुम्हाला तुरुंगवासही घडावा लागू शकतो.
advertisement
3/9
कारमध्ये किंवा सोबत किती दारू ठेवता येते?महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) नियमांनुसार, परवाना (Permit) नसताना एखादी व्यक्ती आपल्याकडे खालील मर्यादेपर्यंत मद्य ठेवू शकते:-भारतीय बनावटीची विदेशी दारू (IMFL): कमाल 2 बाटल्या (प्रत्येकी 750 मिली).-बीअर (Beer): कमाल 12 बाटल्या किंवा कॅन (प्रत्येकी 650 मिली किंवा 500 मिली).-देशी दारू: कमाल 2 बाटल्या.
advertisement
4/9
वरील मर्यादा ही एका व्यक्तीसाठी आहे. मात्र, जर तुम्ही कारमध्ये असाल, तर कारमधील एकूण बाटल्यांची संख्या ही कायदेशीर मर्यादेच्या आत असणे आवश्यक आहे. जर एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील, तर प्रत्येकाकडे स्वतंत्र परवाना असणे हिताचे ठरते.
advertisement
5/9
'मद्यप्राशन परवाना' (Liquor Permit) का आवश्यक आहे?महाराष्ट्रात दारू पिण्यासाठी किंवा जवळ बाळगण्यासाठी 'लिकर परमिट' असणे तांत्रिकदृष्ट्या अनिवार्य आहे. जरी तुमच्याकडे मर्यादेत दारू असली, तरी पोलीस किंवा अबकारी अधिकारी परमिटची मागणी करू शकतात.
advertisement
6/9
1. कसे मिळवाल परमिट?तुम्ही कोणत्याही अधिकृत वाईन शॉपमधून केवळ 5 ते 10 रुपयांत 'वन डे परमिट' (One Day Permit) मिळवू शकता.2. ऑनलाईन सुविधा: तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या 'Aaple Sarkar' पोर्टलवर जाऊन वर्षभरासाठी किंवा आजीवन परमिटही काढू शकता.3. वय मर्यादा: महाराष्ट्रात बीअर पिण्यासाठी किमान वय 21 वर्षे आणि हार्ड लिकर (व्हिस्की, रम इ.) साठी किमान वय 25 वर्षे असणे अनिवार्य आहे.तुमच्या गाडीत असलेली दारुची बाटली सिल्ड असली पाहिजे आणि त्याचं बिल असणं देखील गरजेचं आहे.
advertisement
7/9
दुसऱ्या राज्यातून दारू आणणे गुन्हा आहे का?गोव्यात किंवा दमणमध्ये दारू स्वस्त मिळते म्हणून अनेकजण तिथून महाराष्ट्रात दारू आणण्याचा प्रयत्न करतात. पण सावध राहा:कडक बंदी: गोवा किंवा इतर राज्यांतील दारूची एकही बाटली महाराष्ट्रात आणणे हा 'तस्करी' (Smuggling) मानला जातो.अशा वेळी महाराष्ट्रातील अबकारी विभाग तुमची कार जप्त करू शकतो आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे परराज्यातील दारू सोबत बाळगणे टाळाच.
advertisement
8/9
ड्रंक अँड ड्राईव्ह (Drink and Drive) बाबत सावधानपार्टी करून कार चालवताना जर रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण 30 मिलीग्राम प्रति 100 मिली पेक्षा जास्त आढळले, तर मोटार वाहन कायद्याच्या कलम 185 नुसार कडक कारवाई केली जाते. यामध्ये 10,000 रुपयांपर्यंत दंड आणि 6 महिने जेलची तरतूद आहे.
advertisement
9/9
नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करा, पण कायद्याचे पालन करून. कारमध्ये मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवू नका, परमिट सोबत ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'मद्यपान करून गाडी चालवू नका'. तुमची एक चूक तुमच्या आनंदावर विरजण घालू शकते. ज्यामुळे तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात जेलमध्ये होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Alcohol : कारमध्ये दारूच्या बाटल्या घेऊन फिरताय? 'हा' नियम माहीत नसेल तर पोलीस करतील कारवाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल