Male fertility Age: मुल हवं असेल तर ही 5 वर्ष महत्त्वाची, बाप होण्याचं योग्य वय कोणतं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
What is the Male fertility Age: जसं आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीचं एक योग्य वय असतं, त्याप्रमाणे आई-वडील होण्याचं ही योग्य किंवा एक आदर्श वय आहे.
advertisement
1/9

हल्ली जोडपं वयाच्या खूप उशीरा लग्न करतात आणि त्यानंतरही काही वर्षांनी ते बेबी प्लानिंग करतात. अनेक सेलिब्रिटी उशीरा लग्न करतात आणि त्यांना ही मुल होतं याचा विचार करुन लोकांच्या मनात संभ्रम आहे की उशीराही मुल होतात. पण प्रत्येकाची मेडीकल कंडिशन वेगळी असते या गोष्टींना अनेक लोक महत्व देत नाहीत. पण सायन्सनुसार काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
advertisement
2/9
जसं आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीचं एक योग्य वय असतं, त्याप्रमाणे आई-वडील होण्याचं ही योग्य किंवा एक आदर्श वय आहे. त्या वयात तुम्ही पालक झालात तर तुमचं बाळ हेल्दी जन्माला येईल.
advertisement
3/9
अनेक ठिकाणी लोकांचा असा समज आहे की जोडप्याला बाळ झालं नाही तर त्यात बाईचाच दोष असतो, पुरुषाला कोणताच त्रास किंवा अडथळा येत नाही. पण असं नाही, हा लोकांचा गैरसमज आहे.
advertisement
4/9
कधीकधी स्त्री प्रेग्नेंट न होण्यामागे पुरुष देखील कारणीभूत असू शकतात आणि यामागे वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. जोडप्यांना मूल होण्यासाठी पुरुषाचं वय खूप महत्त्वाचं आहे.
advertisement
5/9
मॅच्युरिटास जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधानुसार, वयोमानानुसार पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होते. जसे रजोनिवृत्तीनंतर म्हणजे बाईची मासिकपाळी थांबली तर तिची गर्भधारणा होण्याची शक्यता नसते. पण पुरुषांमध्ये शुक्राणू बनवण्याची प्रक्रिया कधीच थांबत नाही. त्यामुळे पुरुषांसाठी वय कारणीभूत नाही असं अनेक लोक मानतात पण तसं नाही.
advertisement
6/9
पुरुषांचे जसजसे वय वाढते तसतसे पुरुषांच्या शुक्राणूंचे अनुवांशिक उत्परिवर्तन होते. परिणामी, शुक्राणूंच्या डीएनएचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. या स्थितीत पुरुषांचे वडील होण्याची शक्यताही अनेक वेळा कमी होते.
advertisement
7/9
अभ्यासातून असे दिसून आले आहे की 40 वर्षांनंतर पुरुषांची बाप बनण्याची क्षमता कमी होते आणि जर तो बाप झाला तर नवजात मुलाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही तर त्यांच्या जोडीदारांना गर्भावस्थेतील मधुमेह, प्रीक्लेम्पसिया आणि अकाली जन्म यासारख्या समस्या देखील असू शकतात.
advertisement
8/9
अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर वडिलांचे वय जास्त असेल तर बाळाला न्यूरोलॉजिकल रोग होण्याचा धोका वाढतो. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की जर वडील मोठे असतील तर नवजात बाळामध्ये हृदयाच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे योग्य वेळेत बाबा होणं केव्हाही चांगलं.
advertisement
9/9
तज्ज्ञांच्या मते, 25 ते 30 वर्षे वय हे पुरुषांसाठी वडील बनण्यासाठी चांगलं वय आहे. या वयात शुक्राणू सर्वात जास्त सक्रिय असतात. परंतु हे देखील खरे आहे, 50 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुषांमध्ये मुले जन्माला घालण्याची क्षमता असते. पण अशावेळी नवजात अर्भकामध्ये विविध गुंतागुंत होण्याचा धोका असतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Male fertility Age: मुल हवं असेल तर ही 5 वर्ष महत्त्वाची, बाप होण्याचं योग्य वय कोणतं?