TRENDING:

Millets Benefits : मिलेट्समध्ये नेमकं कोणकोणतं धान्य येतं? जाणून घ्या प्रत्येक धान्याचे फायदे..

Last Updated:
आपल्या रोजच्या आहारात धान्यांचा वापर होतोच. आपण जास्त प्रमाणात गहू आणि तांदूळ या 2 धान्यांचाच वापर करतो. मात्र आपण नेहमी खात असलेल्या गहू आणि तांदूळ यापेक्षाही हेल्दी आणि चांगले काही धान्य असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांना मिलेट्स म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया मिलेट्समध्ये कोणकोणते धान्य असतात आणि त्यांचे फायदे काय आहेत.
advertisement
1/10
मिलेट्समध्ये नेमकं कोणकोणतं धान्य येतं? जाणून घ्या प्रत्येक धान्याचे फायदे..
माणसाच्या बहुतेक समस्यांचे मूळ गहू आणि तांदूळ आहे. हे असे धान्य आहेत, ज्यामध्ये सर्व काही चांगले असूनही फायबरचे प्रमाण कमी असल्याने ते तितके फायदेशीर नसतात. तुमचे पचन बिघडत असेल, गॅसची समस्या होत असेल, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढलेली राहात असेल तर तुम्हाला तुमचा आहार बदलून हेल्दी पदार्थ समाविष्ट करण्याची गरज आहे.
advertisement
2/10
मधुमेह, लठ्ठपणा या समस्यांना हल्ली खूप लोकांना तोंड द्यावे लागते. उपचाराने या समस्यांपासून क्वचितच सुटका होऊ शकते. मात्र यानंतरही काही समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. या समस्यांचे खरे कारण तुमचे खाणेपिणे आहे. चुकीच्या आहारामुळे तुमचे पचन बिघडते, रक्तातील साखरेची पातळी वाढते, मधुमेहाचा धोका वाढतो, शरीरात अनावश्यक चरबी जमा होते आणि यामुळे तुमचे आरोग्य बिघडते.
advertisement
3/10
यातील बहुतेक समस्यांचे मूळ गहू आणि तांदूळ आहे. गव्हाच्या पिठात 2 टक्के (1.9%) पेक्षा कमी फायबर असते तर तांदळात फक्त 0.2% फायबर असते. ब्राऊन राइसमध्ये फायबरचे प्रमाण सुमारे 4 टक्के असते. फायबर कमी असल्यामुळे हे तांदूळ आणि गहू पोटात जाताच पचायला लागतात आणि ऊर्जा बाहेर पडू लागते. ते लवकर पचतात आणि शरीरात जास्त प्रमाणात ग्लुकोज सोडू लागतात.
advertisement
4/10
वजन आणि साखरेची पातळी वाढल्याने लठ्ठपणा येतो, मधुमेहाचा धोका वाढतो, कोलेस्टेरॉलही वाढते, ज्यामुळे हृदयाचे गंभीर आजार होतात. यासाठीच आज आम्ही तुम्हाला काही हेल्दी धान्यांबद्दल माहिती देणार आहोत. यांना मिलेट्स म्हणतात. यामध्ये नाचणी, बाजरी, ज्वारी, झंगोरा, कोदो, बॅरी, चेना, कंगनी, कुटकी, मूग हे धान्य असतात.
advertisement
5/10
पर्ल मिलेट्स - बाजरी - हे धान्य प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. बाजरीचे रोज खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला खूप फायदे होतात.
advertisement
6/10
फिंगर मिलेट्स - नाचणी - नाचणी हे धन्य प्रथिने आणि अमीनो ऍसिडने भरलेली असते. अनेक अभ्यासांनी असे सुचवले आहे की, नाचणी मेंदूच्या विकासासाठी चांगली आहे.
advertisement
7/10
फॉक्सटेल मिलेट्स - कांगणी - हे धान्य रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यास मदत करते, त्यात कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण चांगले असते.
advertisement
8/10
सोरगम मिलेट्स - ज्वारी - हे धान्य लोह, प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. हे वजन कमी करण्यासाठी मदत करते आणि ग्लूटेन असहिष्णुता म्हणजेच ग्लूटेन इंटॉलरन्स असलेल्या लोकांना मदत करते.
advertisement
9/10
लिटिल मिलेट्स - सामा - याला कुटकी असेही म्हणतात. हे लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, जस्त आणि पोटॅशियमने भरलेले आहे. त्यात भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे हे धान्य तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
advertisement
10/10
बकव्हीट मिलेट्स - कुट्टू - हे धान्य मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे. रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग कमी करण्यासदेखील हे मदत करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Millets Benefits : मिलेट्समध्ये नेमकं कोणकोणतं धान्य येतं? जाणून घ्या प्रत्येक धान्याचे फायदे..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल