TRENDING:

सकाळी अलार्म वाजताच उठणं ठरू शकतं जीवघेणं, डॉक्टरांनी सांगितला मोठा धोका

Last Updated:
Alarm clock health risk : अलार्म वाजवून उठण्याची सवय तुम्हाला अनेक आजारांना बळी बनवू शकते. सकाळचा हा अलार्म सायलेंट किलर आहे. डॉक्टरांनी हा अलार्म आपल्या जीवासाठी कसा धोकादायक ठरू शकते हे सांगितलं आहे. 
advertisement
1/7
सकाळी अलार्म वाजताच उठणं ठरू शकतं जीवघेणं, डॉक्टरांनी सांगितला मोठा धोका
आपल्यापैकी बरेच जण सकाळी लवकर उठण्यासाठी अलार्म लावून झोपतात. कुणी घड्याळात अलार्म लावतं तर कुणी मोबाईलमध्ये. अलार्म वाजला रे वाजला की दचकून जाग येते. पण सकाळी अलार्म लावून उठण्याची ही पद्धत जीवघेणी ठरू शकते.
advertisement
2/7
दिल्लीतील एका प्रसिद्ध रुग्णालयातील इंटरनल मेडिसीन डॉ. संजय गुप्ता म्हणतात की, जेव्हा अलार्म वाजतो तेव्हा त्या व्यक्तीची झोप अचानक उडाते. अलार्मचा मोठा आवाज शरीराला अलर्ट मोडमध्ये आणतो. अशा परिस्थितीत शरीरावर ताण वाढतो आणि अ‍ॅड्रेनल नावाचा हार्मोन बाहेर पडतो. तसंच कॉर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनची पातळी देखील वाढते. ज्यामुळे शरीराला धक्का देखील लागू शकतो.
advertisement
3/7
अलार्ममुळे झोपही बिघडते आणि जेव्हा झोपेचे चक्र बिघडते तेव्हा व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडू लागते. यामुळे, एखादी व्यक्ती चिंता किंवा नैराश्याची शिकार होऊ शकते, असं डॉ. गुप्ता यांनी सांगितलं.
advertisement
4/7
अमेरिकेतील व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीने एक अभ्यास करण्यात आला. जेव्हा एखादी व्यक्ती अलार्मच्या मोठ्या आवाजात जागी होते तेव्हा मेंदूच्या हालचाली तीव्र होतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो, असं उघड झालं. याला मॉर्निंग हायपरटेन्शन म्हणतात.
advertisement
5/7
विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार, हे 74% लोकांमध्ये दिसून आलं. अलार्म वाजला की ते सगळे जागे व्हायचे. तर नैसर्गिकरित्या जागे होणाऱ्यांचा रक्तदाब सामान्य असल्याचं आढळून आलं.
advertisement
6/7
अलार्मचा संबंध हृदयविकाराशी देखील आहे. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की अलार्म वाजवण्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. सकाळी अलार्मचा आवाज तात्पुरता रक्तदाब वाढवू शकतो, परंतु सकाळच्या उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका देखील वाढतो.
advertisement
7/7
ज्यांना आधीच हृदयरोग आहे त्यांच्यामध्ये हा धोका दुप्पट होऊ शकतो. 7 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या आणि सकाळी अलार्म वाजल्यावर जागे होणाऱ्यांमध्ये याचा धोका वाढतो. कारण अशा लोकांचे हृदयरोगाचे आरोग्य चांगलं नसतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
सकाळी अलार्म वाजताच उठणं ठरू शकतं जीवघेणं, डॉक्टरांनी सांगितला मोठा धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल