चक्क 1 रुपयात मिळतोय दागिना, मुंबईतील या मार्केटला द्या भेट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
मुंबईत अनेक होलसेल मार्केट असून या ठिकाणी विविध वस्तू अगदी स्वस्तात मिळतात.
advertisement
1/5

भारतातील महिलांचा दागिने हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे सर्वच वयोगटातील महिला कानातले, नेकलेस, बाजूबंद, बांगड्या, कंबरपट्टा, पैंजण हे सर्व दागिणे हौसेनं खरेदी करतात.
advertisement
2/5
आपल्याकडं असलेल्या ड्रेसवर मॅचिंग असा दागिना घेण्याची त्यांची इच्छा असते. पण, वाढत्या महागाईमुळे ते सर्वांना शक्य होत नाही. पण, आता काळजी करू नका. कारण <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईतील</a> मार्केटमध्ये फक्त 1 रुपयांपासूनचे कानातले खरेदी करता येतात.
advertisement
3/5
मुंबईतल्या प्रसिद्ध भुलेश्वर मार्केटमध्ये फक्त 1 रुपयामध्ये कानातल्याचे जोड मिळतात. या मार्केटमधील जिग्न इंपेक्स या दुकानात 1 ते 25 रुपये या किमतीमध्ये कानातले मिळतात. या दुकानात इतर दागिनेही अगदी स्वस्तात मिळतात. केवळ 12 रुपयांमध्ये ब्रेसलेट आणि 15 रुपयांमध्ये खड्यांचे कडे इथं खरेदी करता येतात.
advertisement
4/5
महागाईमुळे प्रत्येक वस्तूची किंमत सातत्यानं वाढत आहे. कोरोना व्हायरसनंतर महागाईमध्ये काही पटीनं वाढ झालीय. पण, मुंबईतील भुलेश्वर मार्केटमध्ये होलसेल दरात वेगवेगळी खरेदी करता येते.
advertisement
5/5
अनेक मुंबईकर लग्नाचा बस्ता इथंच खरेदी करतात. त्याचबरोबर दैनंदीन वापरासाठी दागिने आणि कपडेही इथं स्वस्त दरामध्ये मिळतात. पण, अवघ्या 1 रुपयांमध्ये कानातलं मिळाणारं मुंबईतील हे शॉप सर्वसामान्यांसाठी नक्कीच मोठा खजिना आहे.