TRENDING:

फक्त 50 रुपयांत करा बच्चे कंपनीला खूश, या मार्केटमध्ये मिळतायेत स्वस्तात खेळणी

Last Updated:
मुंबईतील मार्केटमध्ये सुंदर टेडी बियर आणि इतर खिळणी अगदी स्वस्तात मस्त मिळतात.
advertisement
1/7
फक्त 50 रुपयांत करा बच्चे कंपनीला खूश, या मार्केटमध्ये मिळतायेत स्वस्तात खेळणी
मायानगरी <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईची</a> तेथील स्वस्तात मस्त मार्केटसाठीही वेगळी ओळख आहे. मुंबईतील अनेक मार्केट प्रसिद्ध असून यातील क्रॉफर्ड मार्केटमध्ये कपडे, ब्युटी प्रोडक्ट किंवा खेळणी सगळंच अगदी स्वस्तात मस्त मिळतं.
advertisement
2/7
आपण मुलांसाठी एखादं खेळणं घेण्याच्या विचारात असाल तर किचेन गार्डन लेनमधील मंगलदास मार्केट गल्लीत रवी सॉफ्ट टॉईज हा बेस्ट पर्याय आहे. या ठिकाणी हजारो सॉफ्ट टॉईज अगदी कमी किमतीत मिळतात.
advertisement
3/7
क्रॉफर्ड मार्केटमधील दुकानात मध्यम आकाराचे टॉईज आहेत. त्यांची किंमत फक्त 50 रुपयांपासून सुरु होते. त्यापेक्षा मोठी खेळणी 150 रुपयांपर्यंत मिळतात. अगदी 1-2 महिन्यांच्या बाळापासून ते 6 महिन्यांच्या बाळांसाठी सॉफ्ट टाईजमध्ये असणारे पाळणेही उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत दीड हजार रुपयांपासून सुरू होते. यात बाळांना सहज झोपवता किंवा टेकून बसवता येतं.
advertisement
4/7
इथे सॉफ्ट टॉईजमध्ये म्युजिक असणारी मांजरही आहेत. विशेष म्हणजे विविध आकारातील हे टॉईज पाहणाऱ्याला लगेच आकर्षित करतात. त्यांची सुरुवात फक्त 190 रुपयांपासून होते.
advertisement
5/7
तसेच इथे असणाऱ्या 6 ते 7 फुटांच्या टेडींची किंमत फक्त दीड ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहे. विशेष म्हणजे प्रत्येक खेळण्याचा दर्जाही तेवढाच चांगला आहे. त्यामुळे या ठिकाणी खरेदीसाठी नेहमी गर्दी असते.
advertisement
6/7
या सर्व खेळणी वाढदिवसासाठी, लहान बाळांसाठी किंवा अगदी मित्र-मैत्रिणींनाही गिफ्ट म्हणून देता येतील. परवडणाऱ्या किमतीत ही खेळणी मिळतात. तसेच हजारो व्हरायटींमध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
7/7
तसेच तुम्हाला तर एकापेक्षा जास्त खेळणी खरेदी करायच्या असतील तर हे मार्केट खूप छान पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच या मार्केटला भेट देऊ शकता. (मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
फक्त 50 रुपयांत करा बच्चे कंपनीला खूश, या मार्केटमध्ये मिळतायेत स्वस्तात खेळणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल