आईस्क्रीमचा पेन अन् कार्टूनची पिगी बँक, इथं 10 रुपयांपासून मिळतेय युनिक स्टेशनरी, PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
मुंबईतील मार्केटमध्ये कपड्यांपासून ते ब्युटी प्रोडक्टपर्यंत सगळ्याच वस्तू स्वस्तात मस्त मिळतात.
advertisement
1/7

<a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईतील क्रॉफर्ड</a> मार्केटला होलसेल मार्केट म्हणून ओळखलं जातं. क्रॉफर्ड मार्केटमध्ये कपड्यांपासून ते ब्युटी प्रोडक्टपर्यंत सगळ्याच वस्तू स्वस्तात मस्त मिळतात. या सगळ्या वस्तूंमध्ये शाळेसाठी लागणारी स्टेशनरी सुद्धा तितक्याच स्वस्तात मिळते.
advertisement
2/7
अगदी 10 रुपयांपासून स्टेशनरी मिळते. फक्त शाळेसाठीच नाहीतर लहान मुला-मुलींना वाढदिवसाला गिफ्ट किंवा रिर्टनगिफ्ट देण्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. क्रॉफर्ड मार्केटमध्ये प्रत्येक स्टॉलवर स्टेशनरीच्या अनेक युनिक वस्तू पाहायला मिळतात.
advertisement
3/7
या स्टॉलवर कार्टूनच्या आकाराचे शार्पनर, कारच्या आकाराचा खोडरबर पासून ते आईस्क्रिमच्या पेनपर्यंत तसेच डायरीपासून ते युनिक पिगी बँकपर्यंत अनेक प्रकारच्या वस्तू पाहायला मिळतात.
advertisement
4/7
या वस्तूंची किंमती अगदी 10 रुपयांपासून सुरु होते. तर 10 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत विविध डिझाईनचे रबर मिळतात.
advertisement
5/7
20 ते 40 रुपयांपर्यंत आकर्षक पेन्सिल तर 100 ते 250 रुपयापर्यंत पेन्सिल बॉक्स मिळतात. येथे कार्टूनचे पिगी बँक उपलब्ध असून 300 रुपयांपर्यंत हे पिगी बँक मिळतात.
advertisement
6/7
या स्टेशनरीच्या स्टॉलवर होलसेल दरात एक वस्तू किंवा अनेक प्रमाणातही घेऊ शकता. त्यामुळे लहान मुलांसाठी एखादं गिफ्ट घेण्यासाठी असो, शाळेसाठी असो किंवा रिटर्न गिफ्टसाठी असो हे स्टॉल उत्तम पर्याय आहे.
advertisement
7/7
तसेच जर तुम्हाला स्टेशनरीच्या वस्तूंमधल्या काही वस्तूंचा छोटासा घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे मार्केट बेस्ट पर्याय आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
आईस्क्रीमचा पेन अन् कार्टूनची पिगी बँक, इथं 10 रुपयांपासून मिळतेय युनिक स्टेशनरी, PHOTOS