TRENDING:

साधंच पण Evergreen! Valentine's Dayला हेच गिफ्ट द्या, दररोज राहील पार्टनरसोबत

Last Updated:
व्हॅलेंटाईन वीकचा शेवट होतो प्रेमाच्या दिवसाने अर्थात 'Valentine's Day'ने, जो 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. अनेकजण या दिवसासाठी काहीतरी खास प्लॅनिंग करतात. तुम्हीसुद्धा या दिवशी आपल्या पार्टनरला देण्यासाठी रोमँटिक गिफ्टच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्याचसाठी आहे.
advertisement
1/5
Evergreen! Valentine's Dayला हेच गिफ्ट द्या, दररोज राहील पार्टनरसोबत
व्हॅलेंटाईन डे असो किंवा एखादा नॉर्मल दिवस असो, टेडी बियर हे एव्हरग्रीन गिफ्ट मानलं जातं. तुम्ही तुमच्या पार्टनरला सॉफ्ट टॉयसुद्धा गिफ्ट करू शकता. सध्या शिनचॅन, डक आणि डोरेमॉन हे सॉफ्ट टॉय ट्रेंडिंगमध्ये आहेत. मुलींना तर ते प्रचंड आवडतात. विशेष म्हणजे पार्टनर दररोज झोपताना तुम्ही दिलेलं सॉफ्ट टॉय कुशीत घेऊ शकेल.
advertisement
2/5
दुसरं एव्हरग्रीन गिफ्ट म्हणजे परफ्यूम. ज्याच्या प्रत्येक सुगंधासह तुमची आठवण तुमच्या पार्टनरला येईल. व्हॅलेंटाईन वीकनिमित्त बाजारात अनेक चांगल्या सुगंधांचे परफ्युम्स उपलब्ध असतील. गर्लफ्रेंडसाठी परफ्यूम खरेदी करायचं असेल तर कोणत्याही कॉस्मेटिकच्या दुकानात ते तुम्हाला सहज मिळेल.
advertisement
3/5
वॉलेट हे फार साधारण गिफ्ट वाटू शकतं पण तिच सर्वात जास्त कामाची वस्तू आहे. तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडला किंवा गर्लफ्रेंडला एक अत्यंत चांगल्या दर्जाचं वॉलेट गिफ्ट करू शकता. ज्यामध्ये नोटा व्यवस्थित राहतील, सुट्टे पैसे त्यातून पडणार नाहीत, पॅन, आधार असे सर्व महत्त्वाचे कार्ड त्यात सुरक्षित राहतील. हे खूप साधं गिफ्ट असलं तरी दर्जेदार आहे.
advertisement
4/5
पाणी म्हणजे जीवन. त्यामुळे घरात, प्रवासात, कामाच्या ठिकाणी तुमच्या पार्टनरजवळ पाणी असायलाच हवं. त्यासाठी त्याला किंवा तिला एक उत्तम अशी बाटली गिफ्ट करा. पाणी काय, कोणत्याही बाटलीतून पिता येतं, असा विचार करू नका. तज्ज्ञ सांगतात की, तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यावं, त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला तांब्याची बाटली गिफ्ट करू शकता किंवा ज्यात गरम पाणी गरमच राहतं आणि थंड पाणी थंडच राहतं अशी थर्मासची बाटलीही गिफ्ट करू शकता, जी बाराही महिने उपयोगात येईल.
advertisement
5/5
पार्टनरला, फ्रेंडला, घरच्यांना, बाहेरच्यांना कोणालाही देण्यासाठी एक सर्वात सुंदर आणि सर्वात एव्हरग्रीन गिफ्ट म्हणजे ग्रीटिंग कार्ड. पण, पण जरा थांबा...हे ग्रीटिंग कोणत्या साध्यासुध्या वेळी नाही, तर व्हॅलेंटाईन डेला द्यायचंय त्यामुळे ते खास असायलाच हवं. कसा येईल बरं त्यात खासपणा? खासपणा म्हणजे झगमगाट नाही किंवा जास्त पैसे खर्च करणंही नाही, हे आधी लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या पार्टनरला स्वत: बनवलेलं ग्रीटिंग गिफ्ट करू शकता. त्यावर तुमच्या अक्षरात, तुमच्या शब्दात लिहिलेला मजकूर असेल तर उत्तम, तरच त्यात जीवंतपणा येईल आणि हे ग्रीटिंग तुमच्या पार्टनरसाठी अर्थातच खास ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
साधंच पण Evergreen! Valentine's Dayला हेच गिफ्ट द्या, दररोज राहील पार्टनरसोबत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल