TRENDING:

Papaya : रात्री पपई खाणे अमृत की विष? न्यूट्रिशनिस्टकडून जाणून घ्या पपई खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Last Updated:
इतर फळांप्रमाणे पपई खाण्याचीही कोणती विशिष्ट वेळ आहे का? काही लोक सकाळी खातात, तर काहीजण रात्रीच्या जेवणानंतर. अनेकांना प्रश्न पडतो की, पपई रात्रीच्या वेळी खाणे खरंच आरोग्यदायी आहे का?
advertisement
1/9
रात्री पपई खाणे अमृत की विष? न्यूट्रिशनिस्टने सांगितली पपई खाण्याची योग्य वेळ
सकाळ असो वा संध्याकाळ, आपण आहारात फळांचा समावेश करण्याला नेहमीच प्राधान्य देतो. सफरचंद आणि केळी खाणारे खूप आहेत, पण पपई हे एक असे फळ आहे ज्याकडे अनेकजण, विशेषतः तरुण पिढी, दुर्लक्ष करते. यामागचे कारण बहुतांशी त्याचा विशिष्ट वास किंवा चव असू शकते. मात्र, याच दुर्लक्षित पपईमध्ये आरोग्याचे मोठे रहस्य दडलेले आहे. विशेषतः पोटाच्या समस्यांसाठी पपईला ‘रामबाण’ उपाय मानले जाते.
advertisement
2/9
पण, इतर फळांप्रमाणे पपई खाण्याचीही कोणती विशिष्ट वेळ आहे का? काही लोक सकाळी खातात, तर काहीजण रात्रीच्या जेवणानंतर. अनेकांना प्रश्न पडतो की, पपई रात्रीच्या वेळी खाणे खरंच आरोग्यदायी आहे का? जर तुम्हीही पपई कधीही खात असाल, तर पपई खाण्याची योग्य वेळ, पद्धत आणि त्याचे फायदे-तोटे जाणून घेणे आवश्यक आहे.
advertisement
3/9
पपईतील पोषक तत्त्वे: पचनशक्तीचे रहस्यपपई हे केवळ गोड फळ नाही, तर ते पोषक तत्वांनी भरलेले पॉवरहाऊस आहे. पपईमध्ये पुढील महत्त्वाचे घटक आढळतात:व्हिटॅमिन सी जे रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी महत्वाचं आहे. अँटिऑक्सिडंट्स पेशींचे नुकसान टाळण्यासाठी, फायबर पचनसंस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे, पपैन नावाचे एन्झाइम: हेच पपईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. हे एन्झाइम प्रथिने तोडण्यास मदत करते आणि पचनक्रिया सुलभ करते.
advertisement
4/9
काय म्हणतात तज्ज्ञ?टाईम्स ऑफ इंडिया मधील एका बातमीनुसार, पपई रात्री खाणे अधिक फायदेशीर आहे की दिवसा, याबद्दल कोणताही थेट वैज्ञानिक आधार किंवा ठोस संशोधन उपलब्ध नाही.
advertisement
5/9
काही तज्ज्ञांच्या मते, पपई रात्री खाल्ल्यास पचनास मदत होते, कारण ते खूप हलके असते. जर तुम्हाला मध्यरात्री भूक लागली असेल, तर हेल्दी स्नॅक म्हणून तुम्ही याचा आहारात समावेश करू शकता. तरीही, काही लोकांसाठी रात्रीच्या वेळी पपईचे सेवन समस्या निर्माण करू शकते. जर तुम्ही रात्री जास्त प्रमाणात कच्ची पपई खाल्ली, तर त्यातील पपैनमुळे पचन मार्ग आणि अन्ननलिका यांना नुकसान पोहोचू शकते.
advertisement
6/9
ज्या लोकांचे पचन तंत्र, संवेदनशील आहे, त्यांना रात्री पपई खाल्ल्याने गॅस, अपचन आणि ब्लोटिंग यांसारख्या समस्या सुरू होऊ शकतात. गर्भवती महिलांनी कच्ची पपई खाणे कटाक्षाने टाळावे. पपईमध्ये असलेले लॅटेक्स आणि पपैन गर्भाशयाचे आकुंचन करू शकतात. लॅटेक्स ॲलर्जी किंवा गंभीर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर असलेल्या लोकांनीही पपईचे सेवन टाळावे.
advertisement
7/9
किती प्रमाणात सेवन करावे?जर तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची पचनाची समस्या नसेल, तर रात्रीच्या वेळी 100 ते 150 ग्रॅम इतकी मर्यादित पपई खाणे सुरक्षित आहे. मात्र, रात्री पपई खाल्ल्यानंतर लगेच अपचन, ॲसिड रिफ्लक्स किंवा ब्लोटिंगचा त्रास होत असेल, तर तो पदार्थ रात्री न खाल्लेलाच बरा. अशा वेळी तुम्ही पपई दिवसाच्या वेळेत खाऊ शकता.
advertisement
8/9
पपई खाण्याचे जबरदस्त फायदेपपईचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला मोठे फायदे होतात, ज्यात सर्वात महत्त्वाचा फायदा पोटाच्या आरोग्यासाठी आहे.- पपईतील उच्च फायबर आणि पपैन एन्झाइममुळे पचन प्रक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.- व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.- पपईत कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्याने पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हे उत्तम फळ आहे.- यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असल्याने शरीरातील अंतर्गत जळजळ कमी करण्यास मदत होते.
advertisement
9/9
पपई हे खरंच एक आरोग्यदायी फळ आहे, परंतु प्रत्येकाच्या शरीराची पचनशक्ती वेगळी असते. त्यामुळे आपल्या शरीराची प्रतिक्रिया ओळखून योग्य वेळी, योग्य प्रमाणात त्याचे सेवन करणे नेहमीच उत्तम.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Papaya : रात्री पपई खाणे अमृत की विष? न्यूट्रिशनिस्टकडून जाणून घ्या पपई खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल