TRENDING:

आरोग्यासाठी लाभदायी बीट; घरीच बनवा ‘या’ सोप्या पद्धतीनं लाडू रेसिपी

Last Updated:
खरंतर बीट हे कंदमूळ काही जणांना आवडत नाही. त्यामुळे बीटापासून लाडूची पाककृती कशी बनवावी जाणून घ्या.
advertisement
1/7
आरोग्यासाठी लाभदायी बीट; घरीच बनवा ‘या’ सोप्या पद्धतीनं लाडू रेसिपी
खरंतर बीट हे कंदमूळ काही जणांना आवडत नाही. मात्र बरेचसे लोक बीट आणि त्याच्यापासून बनवलेले पदार्थ आवडीने खातात. गृहिणी देखील लहान मुलांना छान आणि पौष्टिक पदार्थ खाऊ घालण्यासाठी बिटाचे विविध पदार्थ तयार करतात.
advertisement
2/7
यामध्ये बिटाचा हलवा, बिटाची कोशिंबीर, बिटाची बर्फी किंवा लाडू असे अनेक पदार्थ आहेत. तर बरेचजण डाएट म्हणून सॅलडमध्ये बीट खाणेही पसंत करतात. याच पदार्थांपैकी बिटाच्या लाडूची पाककृती आपण पाहणार आहोत. <a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरच्या</a> कोमल कांबळे यांनी बिटाची ही पाककृती सांगितली आहे.
advertisement
3/7
बीटाचे लाडू बनवण्यासाठी अगदीच ठराविक साहित्य लागते. साधारण आकाराचे 6 ते 8 लाडू बनवण्यासाठी 1 वाटी बीट खिसून घ्यावे. तसेच एक नारळ खवून बारीक करुन घ्यावा. एक वाटी गूळ, थोडी दुधावरची साय, थोडे तूप, काजू, बदाम, पिस्ता भाजून बारीक केलेली पुड आणि थोडे काप घ्यावेत.
advertisement
4/7
सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून बिटाचा किस भाजून घ्यावा. साधारण 2-3 मिनिट मध्यम आचेवर हा किस थोडा रंग बदलेपर्यंत भाजावा. त्याच पॅनमध्ये खोबरे तूप टाकून भाजावे. खोबरे देखील किमान 3 मिनिट मध्यम आचेवर भाजून घ्यावे.
advertisement
5/7
खोबरे एका बाजूला भाजून घेत असताना दुसऱ्या बाजूला गूळ वितळवून घ्यावा. त्यासाठी गूळ बारीक करुन त्यामध्ये फक्त 2 चमचे पाणी टाकावे. गुळाचा पूर्ण पाक होईपर्यंत तो वितळवून घ्यावा.
advertisement
6/7
या मिश्रणामध्ये घट्टपणा यायला लागल्यानंतर काजू, बदाम, पिस्ता भाजून त्याची केलेली पुड वरुन टाकावी आणि पुन्हा व्यवस्थित हलवत रहावे. आता हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झाले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊन हे मिश्रण थोडे गरम असतानाच मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यावेत. लाडू वळताना वरुन बेदाणे, काजू, बदामचे काप आवडीनुसार लावू शकतो, असंही कोमल सांगतात.
advertisement
7/7
बीट हे खरंतर अनेक कारणांसाठी आरोग्यास उपयुक्त कंदमूळ आहे. बीटामधील घटकांमुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी बीट हे प्रभावी ठरते. बिटात भरपूर फायबर असते, त्यामुळे त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतासारख्या अनेक गंभीर समस्या कमी होतात. तर तज्ज्ञांच्या मते, बिटाचे नियमत सेवन हे स्टॅमिना वाढवण्यासही मदत करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
आरोग्यासाठी लाभदायी बीट; घरीच बनवा ‘या’ सोप्या पद्धतीनं लाडू रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल