Salt : मिठामुळे लाखो भारतीयांचा मृत्यू, वापरण्याची चुकीची पद्धत ठरतेय जीवघेणी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Salt cause death : मिठाशिवाय जेवणाची चव अपूर्ण वाटतं. पण चवीसाठी तुमचं आरोग्य धोक्यात घालू नका. मीठ खाल्ल्याने दरवर्षी 1.75 आपले प्राण गमावत आहेत.
advertisement
1/7

मिठाशिवाय जेवणाची चव अपूर्ण वाटतं. प्रत्येक पदार्थात मीठ आवश्यक मानलं जातं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे मीठ हळूहळू तुमच्या आरोग्यासाठी विष बनू शकतं.
advertisement
2/7
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, भारतीय दररोज जेवढे मीठ वापरत आहेत ते त्यांच्या गरजेच्या दुप्पट आहे.
advertisement
3/7
डॉक्टरांच्या मते, एका व्यक्तीने दररोज जास्तीत जास्त 5 ग्रॅम मीठ सेवन करावं. पण उत्तर भारतात हे प्रमाण सुमारे 10 ते 12 ग्रॅमपर्यंत पोहोचतं, तर दक्षिण भारतात ते 8 ते 10 ग्रॅम असतं.
advertisement
4/7
भारतात सुमारे 2.2 कोटी लोक हृदयरोगाने ग्रस्त आहेत. भारतातील सुमारे 7 कोटी किशोरवयीन मुलं आधीच उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. दरवर्षी 1.75 लाख भारतीय अति प्रमाणात मीठ सेवनामुळे मृत्युमुखी पडत आहेत.
advertisement
5/7
आपल्या रोजच्या मिठाच्या सेवनापैकी 80% मीठ उर्वरित 20% मीठ बिस्किटे, नमकीन, चिप्स, सॉस, वेफर्स आणि इतर पॅकेज्ड पदार्थ अशा बाहेरील अन्नातून येतं.
advertisement
6/7
भारत सरकारने 2030 पर्यंत मिठाचा वापर 30% कमी करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यासाठी कर, जाहिरात नियंत्रण आणि जागरूकता पसरवून प्रयत्न केले जात आहेत. पण यासोबतच आपल्याला स्वतःलाही आपल्या सवयी बदलाव्या लागतील.
advertisement
7/7
सूचना : हा लेख फक्त माहितीसाठी देण्यात आला आहे. जो सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठीने याची पडताळणी केलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Salt : मिठामुळे लाखो भारतीयांचा मृत्यू, वापरण्याची चुकीची पद्धत ठरतेय जीवघेणी