Face Wash Tips : दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा, योग्य पद्धत कोणती?
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
त्वचा डॅमेज होण्याचा धोका असतो. दिवसात चेहरा किती वेळा धुवायचा, तोंड धुण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घ्या. यासंदर्भात 'एनडीटीव्ही हिंदी'ने वृत्त दिलंय. चेहरा किती वेळा धुवायचा?
advertisement
1/9

प्रत्येकजण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो. चेहरा स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे फेसवॉश वापरले जातात. तसेच सिरम, मॉइश्चराययर, क्लिन्झर असे विविध प्रॉडक्ट चेहऱ्याची निगा राखण्यासाठी वापरले जातात.
advertisement
2/9
बरेच लोक चेहरा धुण्यात चुका करतात, त्यामुळे त्यांना इतर समस्या होतात. खासकरून जास्त तेलकट चेहरा असलेले लोक वारंवार तोंड धुतात यामुळे चेहऱ्यावरील नॅचरल ऑइल निघून जातं व त्वचेचा आउटर लेयर निघून जाण्याची शक्यता असते.
advertisement
3/9
त्वचा डॅमेज होण्याचा धोका असतो. दिवसात चेहरा किती वेळा धुवायचा, तोंड धुण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घ्या. चेहरा किती वेळा धुवायचा?
advertisement
4/9
जास्तीत जास्त स्किन टाइप्सच्या लोकांना दिवसातून दोन वेळा सकाळी व रात्री चेहरा धुण्यास सांगितलं जातं. सकाळी चेहरा धुणं ही स्किन केअरची पहिली स्टेप आहे, त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चराययर व सिरम लावून घराबाहेर पडता येतं.
advertisement
5/9
त्यानंतरच चेहऱ्यावर मेकअप लावता येतो. दिवसभरातील घाण व चेहऱ्यावरील डेड स्कीन सेल्स निघून जावे यासाठी रात्री चेहरा धुण्याचा सल्ला दिला जातो. चेहरा कसा धुवावा चेहरा धुण्याचा पहिला नियम म्हणजे कधीही गरम पाण्याने चेहरा धुवू नये.
advertisement
6/9
चेहरा धुण्यासाठी थंड किंवा कोमट पाणी वापरावे. तसेच योग्य क्लिन्झर निवडणंही आवश्यक आहे. सर्वात आधी चेहरा पाण्याने ओला करा आणि नंतर सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजेच बोट गोलाकार फिरवत चेहऱ्याच्या टी-झोन आणि जो लाइन्सपासून पूर्ण चेहऱ्यावर क्लिन्झर घासून घ्या.
advertisement
7/9
क्लिन्झर किंवा फेस वॉश चेहऱ्यावर 30 सेकंद चोळता येते. मग चेहरा पाण्याने धुवा आणि स्वच्छ करा. टॉवेल वापरणं टाळा आणि स्वच्छ कापडाने चेहरा स्वच्छ करा. चेहरा टॉवेलने घासून पुसू नका.
advertisement
8/9
तुम्ही संध्याकाळी चेहरा धुत असाल तर आधी चेहऱ्यावरचा मेकअप काढा. मेकअप रिमूव्हरच्या मदतीने चेहऱ्यावरील काजळ, लिपस्टिक, फाउंडेशन आणि मस्करा काढून टाका. यानंतरच चेहरा धुवा.
advertisement
9/9
तेलकट त्वचेसाठी टिप्स जास्त तेलकट त्वचेमुळे वैतागलेले लोक कच्च्या दुधाने आपला चेहरा स्वच्छ करू शकतात. एका भांड्यात कच्चे दूध घेऊन त्यात कापूस बुडवून चेहरा स्वच्छ करा. हे डेड स्कीन सेल्स व जास्तीचे तेल दोन्ही काढून टाकते. यानंतर फेसवॉशने चेहरा धुवा. यामुळे दिवसभर चेहरा तेलकट राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Face Wash Tips : दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा, योग्य पद्धत कोणती?