Tips And Tricks : महागडे कपडे जाळण्यापासून वाचवते 'ही' छोटीशी वस्तू, इस्त्री करताना फॉलो करा सोप्या टिप्स..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Simple tips to keep cloths safe while ironing : हल्ली बरेच लोक आपले कपडे घरीच इस्त्री करतात. काहीवेळा आपल्याला सवय नसल्याकारणाने काही कपडे जळतात. जे लोक नवीनच इस्त्री वापरत असतील त्यांच्यासोबत हे कधी ना कधी घडतेच. मात्र काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे महादगे कपडे जळण्यापासून वाचवू शकता.
advertisement
1/6

आपले महागडे कपडे जसे की, रेशीम, शिफॉन किंवा सिंथेटिकपासून बनलेल्या कपड्यांना जळण्याचा धोका जास्त असतो. कारण यांचे कापड खूप नाजूक आणि पातळ असते. पण आज आम्ही ज्या टिप्स सांगत आहोत, त्या वापरल्यास तुमचे कपडे जळणारही नाहीत आणि त्यावर कसले डागही पडणार नाही.
advertisement
2/6
काहीवेळा इस्त्रीच्या लोखंडाखाली साचलेली घाण कपड्यांवर लागते आणि ती तुमच्या फिकट रंगांच्या कपड्यांवर चिकटून बसते. पण यावरही एक उपाय आहे. एक अशी वस्तू आहे, जी तुमचे कपडे जळण्यापासून तर वाचवेलच, पण कपड्यांवर कसले डागही पडू देणार नाही.
advertisement
3/6
ती वस्तू म्हणजे, आयरन शू कव्हर. हे इस्त्रीच्याच आकाराचे असते आणि इस्त्रीच्या लोखंडी भागावर फिट करता येते. हे कपड्यांसाठी संरक्षक थर म्हणून काम करते. इस्त्रीवर हे आयरन शू कव्हर लावल्याने इस्त्रीचा लोखंडी भाग थेट कपड्यांवर येत नाही. त्यामुळे कपडे जळण्याची शक्यता कमी होते.
advertisement
4/6
आयरन शू कव्हर टेफ्लॉन किंवा उष्णता-प्रतिरोधक पदार्थापासून बनलेले असतात. हे कपड्यांवर सामान प्रमाणात उष्णता पसरवते. याचा वापर केल्यास तुम्हाला इस्त्रीचे तापमान वारंवार कमी जास्त करण्याची गरज पडत नाही. शिवाय यामुळे कपड्यांवर डागही पडत नाही.
advertisement
5/6
महागड्या कपड्यांसाठी खूप हे आपल्याला खूप फायद्याचे ठरू शकते. रेशीम आणि शिफॉनच्या कपड्यांसाठी तर हे बेस्ट आहे. एखादेवेळी चुकून प्रिंट केलेल्या टी-शर्टवर इस्त्री वापरली आणि त्या प्रिंटचा काही भाग जर इस्त्रीला चिकटून राहिला. तर नंतर तो इतर कपड्यांवरही लागण्याची शक्यता असते. अशावेळी हे आयरन शू कव्हर खूप उपयुक्त ठरते.
advertisement
6/6
हे आयरन शू कव्हर तसे फारसे महाग नाही. तुमच्या महागड्या कपड्यांच्या तुलनेत तर याची किंमत नगण्य आहे. तुम्हाला हे बाजारात किंवा कोणत्याही ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर सहज मिळू शकते. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tips And Tricks : महागडे कपडे जाळण्यापासून वाचवते 'ही' छोटीशी वस्तू, इस्त्री करताना फॉलो करा सोप्या टिप्स..