Kaju katli Recipe : दिवाळीसाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा काजू कतली, मिनिटांत रेडी होईल स्वीट ट्रीट!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
दिवाळी म्हटलं की, घरात गोडधोड आणि मिठायांचा सुगंध दरवळतो. पण साखरेऐवजी गुळाचा वापर करून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी अधिक चांगले मानले जातात.
advertisement
1/7

दिवाळी म्हटलं की, घरात गोडधोड आणि मिठायांचा सुगंध दरवळतो. पण साखरेऐवजी गुळाचा वापर करून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी अधिक चांगले मानले जातात. यंदाच्या दिवाळीला पारंपरिक साखरेची काजू कतली न बनवता, केवळ 4 साहित्यामध्ये आरोग्यदायी आणि चविष्ट 'गुळाची काजू कतली' बनवण्याची सोपी कृती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ही खास स्वीट ट्रीट अवघ्या काही मिनिटांत तयार होते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते.
advertisement
2/7
काजूची पावडर तयार करा: मिक्सरच्या भांड्यात काजू घ्या आणि 'पल्स मोड' वापरून त्याची बारीक पावडर बनवा. मिक्सर जास्त वेळ चालवू नका, नाहीतर काजूतून तेल सुटून त्याचा गोळा बनेल.
advertisement
3/7
गुळाचा पाक तयार करा: एका पॅनमध्ये किसलेला गूळ आणि अगदी थोडे पाणी घालून मंद आचेवर गरम करा. गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत ढवळत राहा. याचा एक तारी पाक तयार करायचा आहे.
advertisement
4/7
मिश्रण एकत्र करा: गुळाच्या पाकात काजूची पावडर घाला आणि मिश्रण चांगले मिसळून घ्या. हे मिश्रण हळूहळू घट्ट होऊन पॅन सोडायला लागेल. हे मिश्रण जास्त शिजवू नका, नाहीतर कतली कडक होईल.
advertisement
5/7
तूप लावून मळा: एका बटर पेपरवर किंवा तुपाचा हात लावलेल्या प्लेटवर हे मिश्रण काढा. ते गरम असतानाच तुपाचा हात लावून मऊ गोळा होईपर्यंत मळून घ्या.
advertisement
6/7
लाटून आकार द्या: या गोळ्याला बटर पेपरच्या मदतीने हलके लाटून घ्या. तुम्हाला हव्या असलेल्या जाडीनुसार ते लाटा. नंतर यावर चांदीचा वर्क लावू शकता किंवा पिस्त्याचे तुकडे टाकू शकता.
advertisement
7/7
कतली कापून सेट करा: हे मिश्रण थोडे गार झाल्यावर (किंवा सुमारे 10 मिनिटांनी) सुरीने डायमंडच्या आकारात कतलीचे तुकडे कापून घ्या. अशा प्रकारे तुमची हेल्दी गुळाची काजू कतली तयार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kaju katli Recipe : दिवाळीसाठी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा काजू कतली, मिनिटांत रेडी होईल स्वीट ट्रीट!