Astrology: नशीब पालटण्याची वेळ आलीच! त्रिदशांश योग जुळून आल्यानं 3 राशींना खुशखबर, भाग्याची साथ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी गोचर करून शुभ आणि अशुभ योगांची निर्मिती करतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनासोबतच देश-जगावरही दिसून येतो. बुध आणि गुरू यांच्या संयोगाने एक अत्यंत शुभ योग तयार होत आहे. द्रिक पंचांगनुसार, जेव्हा बुध आणि गुरू हे ग्रह एकमेकांपासून १०८ अंशांच्या कोनात येतात, तेव्हा हा योग तयार होईल.
advertisement
1/7

याला त्रिदशांश योग असं म्हटलं गेलं आहे. हा योग तयार झाल्यामुळे काही राशींचा उत्तम काळ जणू गोल्डन टाइम सुरू होऊ शकतो. तसेच, करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. जाणून घेऊया, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.
advertisement
2/7
धनु रास - धनु राशीच्या लोकांसाठी त्रिदशांश योग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात जबरदस्त वाढ होऊ शकते. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या कौटुंबिक समस्या आता संपुष्टात येऊ शकतात.
advertisement
3/7
धनू राशीच्या विवाहित लोकांना संतान सुखाची प्राप्ती होण्याचे योग तयार होत आहेत. तसेच, या काळात तुम्ही एखादे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. नोकरीच्या तयारीला लागलेल्यांना यश मिळेल. नोकरीपेशा लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे जागी बदली मिळू शकते. तसेच, तुमच्या इच्छांची पूर्ती होईल.
advertisement
4/7
कर्क रास - त्रिदशांश योग तयार झाल्यामुळे कर्क राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल. तसेच, नोकरी करणाऱ्या लोकांना यावेळी नवीन जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.
advertisement
5/7
या काळात कर्क राशीच्या लोकांची कमाई वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील. त्याचबरोबर व्यवसायात मोठी डील होऊन मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. दीर्घकाळापासून असलेल्या आर्थिक अडचणी आता दूर होतील. या काळात तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील.
advertisement
6/7
वृषभ रास - वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रिदशांश योग खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कुटुंबात आनंद आणि सलोखा वाढेल. तसेच, घरात मांगलिक कार्य किंवा एखाद्या शुभ समारंभाचे आयोजन होऊ शकते. आपल्या लोकांसोबतचे नातेसंबंध अधिक मधुर होतील.
advertisement
7/7
नोकरीत असलेल्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. तसेच, जे लोक व्यापार किंवा गुंतवणुकीशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी हा काळ नवीन संधी आणि लाभाचे दरवाजे उघडणारा आहे. पैशांशी संबंधित अडकलेली प्रकरणे सुटू शकतात. तसेच, तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Astrology: नशीब पालटण्याची वेळ आलीच! त्रिदशांश योग जुळून आल्यानं 3 राशींना खुशखबर, भाग्याची साथ