TRENDING:

Shirish Gawas : 'हे पहायला तू हवा होतास', Red Soil Storiesचा शिरिष गवसच्या निधनानंतर बायकोची भावुक पोस्ट

Last Updated:
Red Soil Stories Shirish Gawas Wife Post : रेड सॉइल स्टोरीज या युट्यूब चॅनेलचा युट्यूबर शिरिष गवसचं काही दिवसांआधी निधन झालं. त्याच्या निधनानंतर त्याची बायको पूजा हिने भावुक पोस्ट लिहिली आहे.
advertisement
1/11
'हे पहायला तू हवा होतास', शिरिष गवसच्या निधनानंतर बायको पूजाची भावुक पोस्ट
युट्यूबच्या जगातील रेड सॉइल स्टोरी या प्रसिद्धचा शिरीष गवस याचं काही दिवसांआधी निधन झालं. शिरीषचा ब्रेन हॅम्रेजमुळे मृत्यू झाला.
advertisement
2/11
त्याच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. शिरीषचं निधन हे अनेकांसाठी चटका लावणारं होतं. शिरीषच्या मृत्यूपश्चात त्याची पत्नी पूजा आणि मुलगी श्रीजा असं कुटुंब आहे.
advertisement
3/11
रेड सॉइल स्टोरीज या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून पूजा आणि शिरीष यांनी लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या युट्यूब चॅनेलला भरगोस प्रतिसाद मिळत होता.
advertisement
4/11
पूजा आणि शिरीष यांचा संसारही मार्गी लागला होता. त्यांना दीड वर्षांची मुलगी होती. दोघांचा सुखी संसाराला नजर लागली आणि शिरीषचा अनाचक मृत्यू झाला.
advertisement
5/11
शिरीषच्या मृत्यूनंतर जवळपास 3 महिने रेड सॉइल स्टोरीज हे युट्यूब चॅनेल बंद होतं. पण अखेर शिरीषचं स्वप्न पूर्ण करणं हे ध्येय समोर ठेवून त्याची पत्नी पूजा हिनं पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली.
advertisement
6/11
काही दिवसांआधी तिने एक व्हिडीओ शेअर करत शिरीषला नेमकं काय झालं होतं हे सांगितलं.
advertisement
7/11
त्यानंतर आता पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. पूजा आणि शिरीष यांच्या रेड सॉइल स्टोरीजचे 5 लाख सब्स्क्राइबर्स पूर्ण झाले.
advertisement
8/11
पूजाने पोस्ट लिहित म्हटलं, "बघ शिरिष... आपले 5 लाख सब्स्क्राइबर्स कम्पिट झाले आज... हे पाहायला तू हवा होतास... मिस यू..."
advertisement
9/11
सांगायचं झाल्यास, पूजाने तिचं युट्यूब चॅनेल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून नव्या व्हिडीओचं शूटींग सुरू केलं आहे.
advertisement
10/11
कोकणातील प्रसिद्ध युट्यूबर कोकणी रानमाणूस याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करत पूजाला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्यात.
advertisement
11/11
प्रसादने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "आपल्या 2022मधील मुलाखतीनंतर पुन्हा एकदा भेट झाली. शिरिष दादा मिस यू. आता तिचा प्रवास धैर्याने पुनर्जन्म घेत आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shirish Gawas : 'हे पहायला तू हवा होतास', Red Soil Storiesचा शिरिष गवसच्या निधनानंतर बायकोची भावुक पोस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल