TRENDING:

Diwali 2025 : अजूनही दिवाळीत काय घालायचं ठरलं नाही? बॉलिवूडच्या या 5 अभिनेत्रींचे लुक करा रिक्रिएट

Last Updated:
Diwali 2025 : यंदाच्या दिवाळीत तुम्हीही जर एखाद्या बॉलीवूड स्टार सारखी दिसण्याची इच्छा ठेवत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी काही खास आणि कैलासी आउटफिट्स घेऊन आलो आहोत. हे आउटफिट्स तुम्ही या दिवाळीत रिक्रिएट करू शकता. चला पाहूया 5 अभिनेत्रींचे खास दिवाळी लुक्स.
advertisement
1/5
अजूनही दिवाळीत काय घालायचं ठरलं नाही? या 5 अभिनेत्रींचे लुक करा रिक्रिएट
आलिया भट्ट : आलिया भट्टचा जांभळ्या रंगाचा लहंगा हा दिवाळीसाठी एकदम परफेक्ट आहे. हा लुक रिक्रिएट करून तुम्हीही अतिशय सुंदर दिसू शकता. आलियासारखे तुम्ही रेड रंगाचे मॅचिंग इअररिंग्स घालू शकता. ओपन हेअरस्टाईलसह हा लुक पूर्ण होईल. या दिवाळीत आलियाचा हा लुक नक्की ट्राय करा.
advertisement
2/5
क्रिती सॅनॉन : क्रिती सॅनॉनची पिवळी साडी दिवाळी पार्टीसाठी एकदम आकर्षक पर्याय आहे. हेवी झुमके आणि लाईट मांगटिकेसह तुम्हीही खूपच सुंदर दिसाल. सटल मेकअपने हा लुक पूर्ण करा. दिवाळी पार्टीपासून ते दिवाळी पूजेपर्यंत हा आउटफिट योग्य ठरेल.
advertisement
3/5
अनन्या पांडे : अनन्या पांडेचा हा थ्री पीस आउटफिट तुमची दिवाळी पार्टी हिट करून टाकेल. अनन्यासारखा साधा मेकअप आणि कमीत कमी ज्वेलरीसह तुम्ही झळकून दिसाल. ओपन हेअरस्टाईलमुळे हा लुक अधिक खुलून दिसेल. दिवाळी पार्टीसाठी हा लुक उत्तम पर्याय आहे.
advertisement
4/5
दीपिका पदुकोण : तुम्हाला यंदाच्या दिवाळीत अनारकली सूट घालायचा असेल, तर दीपिका पदुकोणचा हा लुक सर्वोत्तम पर्याय आहे. फ्लोरल अनारकली सूट तुम्ही पूजा आणि पार्टी दोन्ही ठिकाणी आरामात कॅरी करू शकता. हेवी झुमके आणि सिंपल बनसह हा लुक परफेक्ट दिसेल.
advertisement
5/5
तारा सुतारिया : स्ट्रेट पँट आणि कुर्त्याचा तारा सुतारियाचा हा लुक तुम्हीही या दिवाळीत रिक्रिएट करू शकता. ब्लॅक बनारसी सूट हा स्टाईलिश आणि एलिगंट पर्याय आहे. ऑफिस पार्टीसाठीही हा लुक योग्य आहे. ओपन हेअर, साधा मेकअप आणि ब्लॅक हिल्ससह हा लुक पूर्ण होतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Diwali 2025 : अजूनही दिवाळीत काय घालायचं ठरलं नाही? बॉलिवूडच्या या 5 अभिनेत्रींचे लुक करा रिक्रिएट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल