यावर्षी धनत्रयोदशीचा सण १८ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाईल. या दिवशी माता लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. या दिवशी काही वस्तू खरेदी केल्यानं या तिन्ही देवी-देवतांची विशेष कृपा प्राप्त होते, असे म्हणतात. धनत्रयोदशीला धने खरेदी करण्याचे काय फायदे आहेत आणि ते खरेदी केल्यानंतर काय करावे, याविषयी जाणून घेऊ.
advertisement
धनत्रयोदशीला धने का खरेदी केले जातात?
ज्योतिषशास्त्रानुसार, धनत्रयोदशीला धनं खरेदी केल्यानं धन आणि समृद्धी वाढते. तसेच, माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. धने केवळ एक मसाला नाही, तर ते शुभतेचे प्रतीक देखील मानले गेले आहे. धण्याचा संबंध बुध ग्रहाशी मानला जातो आणि हा ग्रह व्यापार आणि धनावर प्रभाव टाकतो. म्हणूनच धनत्रयोदशीच्या संध्याकाळी धने खरेदी केल्याने व्यवसायातही भरपूर लाभ मिळतो, असं मानलं जातं.
धनत्रयोदशीला धने खरेदी केल्यानंतर काय करावे?
धनत्रयोदशीला धने खरेदी केल्यानंतर त्याचे काय करावे? धनत्रयोदशीला खरेदी केलेले धने देव्हाऱ्यात ठेवावेत. अनेक लोक ते धनत्रयोदशीच्या पूजेत ठेवतात, तर काही लोक दिवाळीच्या पूजेत. तुमच्या घरी जी परंपरा असेल, त्यानुसार तुम्ही करू शकता.
दिवाळीच्या आनंदात एक गोष्ट विसरू नका! नरक चतुर्दशीला यमतर्पण करण्याचं महत्त्व
पूजेनंतर धण्याचे बी जमिनीत पेरावे. जसे जसे धण्याचे बी अंकुरित होतात, तसतशी घरातील समृद्धी वाढत जाते. काही लोक पूजेत वापरलेले धण्याचे बी आपल्या घरातील तिजोरीत देखील ठेवतात. यामुळे वर्षभर माता लक्ष्मीची कृपा राहते, असे म्हणतात. तर काही ठिकाणी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजेनंतर धने घरात ठेवले जातात आणि त्यांचा उपयोग पुढील पीक घेण्यासाठी किंवा व्यापाराच्या सुरुवातीस केला जातो.
धण्याचे बी सांगतात तुमची आर्थिक स्थिती -
धनत्रयोदशीला खरेदी करून आणलेले धने भविष्यात आपली आर्थिक स्थिती कशी असेल हे सांगतं. या धन्यातून हिरवीगार रोपं बाहेर आल्यास तुमच्या जीवनात धन-समृद्धी वाढते. ही रोपं जेवढी दाट निघतील, तेवढे जास्त धन तुमच्याकडे येईल, असं मानलं जातं.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)