TRENDING:

Kitchen Hacks : स्वयंपाक करताना डोळ्यामध्ये तिखट गेल्यास करा 'हे' सोपे उपाय, तात्काळ कमी होईल जळजळ!

Last Updated:
Useful kitchen hacks : स्वयंपाकघरात काम करणं सोपं नसतं. कधी हाताला कट लागतात, कधी चटका लागतो, कधी फोडणीचे तेल अंगावर उडते तर कधी डोळ्यांमध्ये तिखट जातं. हे सगळे प्रसंग क्वचित घडत असले तरी ते कुइप त्रासदायक असतात. आज आम्ही तुम्हाला डोळ्यात तिखट गेल्यास काय जळजळ कधी कमी करावी यासाठी उपाय सांगत आहोत.
advertisement
1/5
स्वयंपाक करताना डोळ्यात तिखट गेल्यास करा 'हे' उपाय, तात्काळ कमी होईल जळजळ!
स्वयंपाक करताना कधी तिखट उडतं किंवा कधी चुकून तिखटाचा हात डोळ्यांना लागतो. कधीतरी कांद्यामुळेहि डोळ्यांची आग आणि जळजळ होते. अशावेळी डोळ्यांची जळजळ कमी कारण्यासाठी काही सोपे उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला पाहुयात ते कोणते आहेत.
advertisement
2/5
दुधाचा वापर : डोळ्यात तिखट गेल्याने जळजळ होत असेल तर थंड दुधात कापसाचा गोळा भिजवा आणि ते तुमच्या डोळ्यांच्या कडांना लावा. यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होईल. थंड दुधामुळे लवकर आराम मिळतो.
advertisement
3/5
मधाचा वापर : मधदेखील अनेक समस्यांवर आणि आजारांवर रामबाण उपाय मानले जाते. मध डोळ्यांची जळजळ कमी करण्यास मदत करू शकते. तिखटामुळे डोळ्यांची जळजळ होत असेल, तर खालच्या पापण्यांजवळ मध लावा. यामुळे त्वरित आराम मिळेतो.
advertisement
4/5
तुपाचा वापर : तूप अन्नाची चव वाढवतच, सोबतच आयुर्वेदामधे तूप प्रभावी औषध मानले जाते. ते नाभीवर लावल्याने मिरचीमुळे डोळ्यांची होणारी जळजळ कमी होते. तूपाचा प्रभाव थंड असतो. म्हणून कधी डोळ्यांची जळजळ होत असेल तर पापण्यांभोवती तूप लावा. त्याचा थंडावा हा त्रास थांबवेल. मात्र शुद्ध तूप वापरा.
advertisement
5/5
फुंकत मारणे : डोळ्यांना पदार्थ लावण्याव्यतिरिक्त साधी फुंकर मारल्यानेदेखील डोळ्यांची जळजळ कमी होऊ शकते. मऊ रुमाल घ्या आणि त्यात गरम हवा फुंकून डोळ्यांना लावा. नंतर दोन किंवा तीन वेळा थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. यामुळे जळजळ कमी होईल. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Hacks : स्वयंपाक करताना डोळ्यामध्ये तिखट गेल्यास करा 'हे' सोपे उपाय, तात्काळ कमी होईल जळजळ!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल