Vitamin K benefits: ‘व्हिटॅमिन के’ चे आहेत, ‘इतके’ फायदे, ‘या’ पालेभाज्यांमधून भरून काढा ‘व्हिटॅमिन के’ ची कमतरता
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Benefits of Vitamin K in Marathi: ‘व्हिटॅमिन के’ हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचं जीवनसत्त्वं आहे. मात्र दुर्देवाने ‘व्हिटॅमिन के’ कमतरकडे दुर्लक्ष केलं जातं. रक्त गोठण्यासाठी ‘व्हिटॅमिन के’ फायद्याचं आहे. याशिवाय ते मेंदूपासू ते हाडांच्या आरोग्यासाठीही ‘व्हिटॅमिन के’ फायद्याचं ठरतं. जाणून ‘व्हिटॅमिन के’ चे फायदे आणि कोणत्या पदार्थातून आपण ‘व्हिटॅमिन के’ मिळवू शकतो.
advertisement
1/9

हाडांचा ठिसूळपणा कमी करून हाडं मजबूत करण्यात ‘व्हिटॅमिन के’ फायद्याचं ठरतं. त्यामुळे जर तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन के’ ची कमतरता असेल तर हाडं फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.
advertisement
2/9
‘व्हिटॅमिन के’ हृदयासाठी देखील खूप महत्वाचं आहे. रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणारं कॅल्शियम काढून रक्तप्रवाह सुरूळीत करण्यात ‘व्हिटॅमिन के’ महत्त्वांची भूमिका बजावतं.
advertisement
3/9
आपल्याला एखादी जखम झाली तर रक्तस्राव होतो. जखम लहान असेल तर थोड्यावेळाने हा रक्तस्राव थांबतो. कारण ‘व्हिटॅमिन के’ रक्त घट्ट करून रक्तस्राव थांबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
advertisement
4/9
मेंदूच्या आरोग्यासाठीही ‘व्हिटॅमिन के’ अत्यावश्यक आहे. ‘व्हिटॅमिन के’मुळे न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांना अटकाव व्हायला मदत होते.
advertisement
5/9
आपल्या शरीरातल्या ग्लुकोज आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यात ‘व्हिटॅमिन के’ महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे जर तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन के’ ची कमतरता असेल तर तुम्हाला डायबिटीस होण्याचा धोक वाढतो.
advertisement
6/9
विविध त्वचा विकारांवर सुद्धा ‘व्हिटॅमिन के’ गुणकारी आहे. डोळ्यांखालची काळी वर्तुळं कमी करून त्वचा तजेलदार करण्यातही ‘व्हिटॅमिन के’ महत्त्वाची भूमिका बजावते.
advertisement
7/9
‘व्हिटॅमिन के’हे दाहक-विरोधी आहे. त्यामुळे पाठीच्या हाडांची सूज दूर होण्यास मदत होते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
advertisement
8/9
‘व्हिटॅमिन के’ हे पचनास फायद्येशीर आहे. अन्न व्यवस्थित पचल्याने पोटावर ताण येत नाही. त्यामुळे पोटाचं आरोग्य सुधारयला मदत होते. व्यक्तीला निरोगी ठेवून शरीराला ऊर्जा देण्यातं काम ‘व्हिटॅमिन के’ करतं.
advertisement
9/9
ब्रोकोली, पालक अशा विविध प्रकारच्या हिरव्या भाज्यांमधून ‘व्हिटॅमिन के’ आपल्याला मिळू शकतं. याशिवाय किवी, अव्हॅकॅडो, केळी अशा फळांमधूनही ‘व्हिटॅमिन के’ भरपूर प्रमाणात मिळू शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Vitamin K benefits: ‘व्हिटॅमिन के’ चे आहेत, ‘इतके’ फायदे, ‘या’ पालेभाज्यांमधून भरून काढा ‘व्हिटॅमिन के’ ची कमतरता